गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण याचा निर्णय 2008 मध्येच झालाय, नितेश राणेंचं वक्तव्य
नितीश राणे : पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी निवडणुका गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा वारसदार म्हणून निवडणुका लढवल्या आहेत. 2008 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी वारसदार कोण याचा निर्णय घेतला होता. वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांचे नाव गोपीनाथ मुंडे यांनी घेतले होते असे वक्तव्य मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. गोपीनाथ मुंडे यांच्या वारस पंकजा मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांच्या मनात होतं, यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही, असे नितेश राणे म्हणाले. धनंजय मुंडे यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली होती. भुजबळ साहेबांनी हे स्वतःच मत नोंदवल नसते तर बरे झाले असते असं माझं मत असल्याचे नितेश राणे म्हणाले.
मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे
मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी निर्णय घेतला असल्याचे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं. महाराष्ट्र राज्य आपलं पहिलं राज्य आहे त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना विजेमध्ये सवलत भेटते तसेच मच्छीमार बांधवांना आता विजेची सवलत मिळण्याचा जीआर राज्य सरकारने जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना वीज वापरण्यामध्ये सवलत भेटते. ती सवलत आता मच्छीमार बांधवांना पण मिळणार आहे. जवळपास 44 टक्के बचत वीज बिलामध्ये होणार आहे. या निर्णयाबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे मनापासून आभार मानतो असे नितेश राणे म्हणाले.
2008 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी वारसदार कोण याचा निर्णय घेतला होता
आमच्या मच्छीमार बांधवांना एक फार मोठा दिलासा आणि आकार देण्याचं काम आमच्या महायुतीच्या सरकारने केलं आहे. 1995 मध्ये युतीचे पहिल्यांदा शासन आले आहे. त्यामध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. 1995 ते 2008 स्थानिक स्वराज्य विधानसभा लोकसभा अशा निवडणुका आम्ही सोबत लढवल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचा विश्वासू सहकारी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाल्याचे नितेश राणे म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.