ठाकरे ब्रँडच्या ‘बेस्ट’ पराभवावर मंत्री नितेश राणेंची पहिली; पडळकर म्हणाले, ब्रँडचा बँड वाजला

मुंबई : राजधानी मुंबईतील सर्वोत्कृष्ट पतपेढीच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. कारण, दोन्ही ठाकरे पहिल्यांदाच या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले होते. राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आल्यामुळे यंदाची बेस्ट पतपेढीची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीत ठाकरे बंधू (उधव ठाकरे)आणि महायुतीच्या पॅनेलमध्ये मुख्य लढाई होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकवत शशांक राव यांच्या पॅनेलने 21 पैकी 14 जागा जिंकत बाजी मारली. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलने 7 जागांवर विजय मिळवला. तर, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे, या निकालाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुतीचे नेते या विजयाचा आनंद व्यक्त करताना महापालिका निवडणुकांवरही भाष्य करत आहेत. आता, या निकालावर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh rane) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाची गेल्या काही वर्षातील बेस्टमधील निष्क्रियताच त्याच्या पराभवाला कारणीभूत असल्याची चर्चा निकालानंतर रंगली आहे. तर, ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी भाष्य केले. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भाजपने पैशांचा प्रचंड वापर केला. या पैशासमोर आम्ही हरलो, असे मत सुहास सामंत यांनी व्यक्त केले. तर, ही लहान निवडणूक आहे, यावर मला प्रश्न विचारु नका, असे संजय राऊत यांनी म्हटले. आता, मंत्री नितेश राणेंनी बेस्ट विजयावर आणि ठाकरेंच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. बेस्टची निवडणूक कालच संपन्न झाली, कालच निकाल लागला. या निवडणुकीत शशांक राव यांना 14 तर प्रसाद लाड यांना 7 जागा मिळाल्या आहेत. मराठी माणसाला कोणीही गृहित धरु नये. कारण, बेस्ट निवडणुकीत बॅलेटवर मतदान झालंय. कैवारी फक्त आम्ही असं बोलणारे आता कोणत्या बिळात लपले आहेत. आज हिंदू समाजाला समजलंय, ठाकरे ब्रँडचे काही घेणे देणे नाही. आम्ही पहिल्यादिवसापासून बोलतोय मराठी माणूस आमच्या बाजूला आहे. आम्ही काय पाकिस्तानातून आलो होतो का, अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली.

महायुतीबरोबर मराठी माणूस आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. भ्रष्टाचार किती झाला त्या पतपेढीमध्ये, उबाठाने पैसे वाटण्याचा आरोप करू नये, असे म्हणत संजय राऊतांच्या आरोपावरही राणेंनी भाष्य केलं. मराठी माणूस हिंदूंबरोबर सूर मिळत नाही, उर्दूवाल्यांसोबत त्यांचे सूर जुळतात. बाळासाहेब हा विषय वेगळा होता, हे डुप्लिकेट आहेत, ज्यांना लोकांनी जागा दाखवली.

मनसेची ताकद नव्हती, त्यांनी स्वत:ला बदनाम करुन घेतलं

मनसेची यात ताकद नव्हती त्यांनी लक्ष घातलं नव्हतं, मनसेनं का स्वत:ला बदनाम करुन घेतलं मला कळत नाही. राज ठाकरेंना न विचारता हे सगळं केलं होतं. संदीप देशपांडे आणि लोकांनी शाहणं झालं पाहिजे, काही गरज नव्हती उगाच बदनाम होण्याची, असे म्हणत राणेंनी मनसेला सल्लाही दिला आहे.

ब्रँडचा बँड वाजला

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ठाकरे बंधूंच्या बेस्ट निवडणुकीतील पराभवावर भाष्य केलंय. महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे, ठाकरे बँड आहे असं वातावरण तयार केलं जात आहे. पण, जे मुंबईत केलं गेलं त्या ठाकरे ब्रँडचा बँड वाजला आहे. बेस्टच्या निवडणुकीत कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाने शशांक राव यांचा पॅनल विजय झाला, महानगरपालिकेची ही रंगीत तालीम होती. त्यात, ब्रँडची हवा काढण्याचे काम या निवडणुकीत झाल्याचंही पडळकर यांनी म्हटले.

हेही वाचा

ठाकरेंना कसं हरवलं, देवेंद्र फडणवीसांची मदत कशी झाली, शशांक राव यांनी BEST निवडणुकीच्या यशाची इनसाईड स्टोरी सांगितली!

आणखी वाचा

Comments are closed.