पुण्यात मोठे मत्स्यालय ते AI तंत्रज्ञानाचा वापर, मत्स्य व्यवसायासंदर्भात मोठे निर्णय होणार

नितेश राणे: मत्स्यपालन व्यवसाय व शेतीसंदर्भात आज विविध निर्णय घेण्यात आले आहेत. मत्स्य खात्यात गोड्या पाण्यातील तलावातील मासेमारीसंदर्भात आज पुण्यात बैठक पार पडली.
यामधये गाळ कसा काढायचा यावर चर्चा झाली. तसेच पुण्यात मोठे मत्स्यालय सुरू करण्याची योजना आहे. यासाठी हडपसरमध्ये जागा उपलब्ध असल्याची माहिती मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य व्यवसायात होणार आहे

मत्स्य उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या

मत्स्य उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. सध्या अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे नितेश राणे म्हणाले. मत्स्य शेतीविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
पुढील आर्थिक वर्षात यामध्ये बदल दिसून येणार आहेत. सांगली, कोल्हापूरमध्ये उत्पादन कमी आहे. तर साताऱ्यात उत्पादन ठीक असल्याचे नितेश राणे म्हणाले. पुण्यात मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन घटल्याचेही राणे म्हणाले. उजनी धरणासारख्या ठिकाणी मत्स्य उत्पादनावर परिणाम झाला आहे. जलसंपदा खात्याकडून मत्स्य खात्याकडे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे.
मत्स्य शेती करणाऱ्यांच्या आर्थिक वृद्धीसाठी प्रयत्न करणार असल्याचे राणे म्हणाले.  दूषित पाण्यामुळे समस्या असल्यास कारवाई सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

AI तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य व्यवसायात होणार

बंदर खात्याच्या अपयशावर उपाययोजना आखणार असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले.  AI तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य व्यवसायात होणार आहे. राज्यात उद्योग येणे आवश्यक आहे. केमिकलमुळे नुकसान होत असल्यास उपाययोजना गरजेची असल्याचेही राणे म्हणाले. मंत्री म्हणून संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.

पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान सक्षम

पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान सक्षम आहेत. यावेळी ठोस उत्तर दिले जाईल. हिंदू सकल समाजाचे मोर्चे निघणार आहेत. जिहादी प्रवृत्तीला प्रत्युत्तर दिले जाईल असे राणे म्हणाले.
हे देवाभाऊंचे सरकार आहे, जनतेचा विश्वास असल्याचे प्रतिपादन राणे यांनी केले. विरोधकांच्या विचारसरणीवर त्यांनी टीका केली. हिंदूंनी सत्तेत बसवले असल्यामुळं जबाबदारी स्वीकारली असल्याचे नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, नुकतीच मंत्रीमंडळाची बैठक झाली आहे. यामध्ये मत्स्यव्यवसायाला (Fisheries) शेतीचा दर्जा दिला जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे. शेतीप्रमाणे मत्स्य व्यवसायीकांना देखील आता नुकसानभरपाई मिळणार आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) यांच्या विभागाचा मोठा निर्णय मानला जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा, मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय, आता विम्यासह नुकसानभरपाई मिळणार

अधिक पाहा..

Comments are closed.