व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
Nitesh Rane On Nilesh Rane: मुळात मला हे कळंल नाही, आम्ही सगळेजण एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पण आमचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यवसाय असतात ना, कोण हॉटेल व्यावसायिक आहे, कोण पर्यटन व्यावसायिक आहे, कोणाचे क्रशर आहेत, कोण रोड कॉन्ट्रॅक्टर आहे. आम्ही राजकारण, समाजकारण धरुन पक्षाचे काम करतो. कारण आम्हाला पक्षाची विचारधारा आवडते. आम्हाला देशासाठी, राज्यासाठी, सिंधुदुर्गासाठी काम करायचं असतं. त्यामुळे आम्ही त्या त्या पक्षाचे सदस्य होतो. त्यामुळे आम्ही वैयक्तिक पोटापाण्याचा विषय बाजूला ठेवू शकत नाही ना? तेच आमचे मित्र विजय केनवडीकर आता नाही तर वर्षानुवर्षे काम करतोहे. बाजारपेठेत त्यांचं स्वत:चं दुकान आहे, त्यांचा व्यवसाय आहे, व्यवसायासाठी त्यांच्या घरात पैशांची उलाढाल असेल तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे?
मला कोणाच्या आरोप-प्रत्यारोप भानगडीत जायचं नाही. ही पूर्ण तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे, पोलीस चौकशी करत आहेत. त्यामुळे आम्ही यामध्ये हस्तक्षेप करणे चुकीचं आहे. असे म्हणत आता मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील निलेश राणेंनी भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या धाडीवर (Nilesh Rane Sting Opration Malvan) भाष्य केलं आहे.
Nitesh Rane: ज्याच्या घरातून हे सापडलं त्यांचा व्यवसाय आणि पार्श्वभूमी आपण लक्षात घेणार आहोत की नाही?
या प्रकरणात मला एवढंच माहिती आहे तेविजय केनवडीकर यांच्याकडून अशाप्रकारची कोणतंही कृत्य होत नाही. भाजपला अशा पद्धतीने निवडणूक लढवण्याची काहीही गरज नाही. आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आहे, आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आम्ही विकास, सरकारी योजनांवर निवडणूक लढवत आहोत. हा जो काही प्रकार घडला त्याबाबत राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस खात्याच्या चौकशीतून उलगडा होईल. ज्याच्या घरातून हे सापडलं त्याचा व्यवसाय आणि पार्श्वभूमी आपण लक्षात घेणार आहोत की नाही? पोलीस याप्रकरणाी नि:पक्षपातीपणे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्याची चौकशी करतील. असेही मंत्री नेते नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.
Nitesh Rane: आम्ही विकासाच्या अजेंड्यावर लढत आहोत, त्याच मुद्द्यावर बोलणार.
भाजपला पैसा वाटण्याची किंवा मसल पॉवर वापरण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या योजनांचे लाभार्थी घराघरात आहेत. ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंड्यावर लढत आहोत. प्रत्येकाला आरोप करण्याचे अधिकार आहेत. कोणी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही 30 तारखेला प्रचार संपेपपर्यंत विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार. असेही नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.