‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या रोहिंग्याना लॉजवर पकडलं तो लॉज नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांचा’
नितेश राणे, सिंधुदुर्गवरील विनायक राऊत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या रोहिंग्याना लॉजवर पकडलं तो लॉज नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांचा आहे, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय. ते सिंधुदुर्गात बोलत होते. यावेळी विनायक राऊतांनी मंत्री नितेश राणे यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली.
क्षपातीपणे निधीचा वाटप केल्यास नितेश राणे यांना कायदेशीर पद्धतीने धडा शिकवू – विनायक राऊत
विनायक राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी तुम्हाला अशी नोटीस देणार की तुमला टर्मिनेट करावे लागेल. मालवणमध्ये भंगार व्यवसायिकाला जी परवानगी दिली ती तुमच्या सरपंचांनी दिली हे तुमच्या बापाची शपथ घेऊन सांगा..पक्षपातीपणे निधीचा वाटप केल्यास नितेश राणे यांना कायदेशीर पद्धतीने धडा शिकवू. देवेंद्र फडणवीस तुम्हाला बाजूला केल्याशिवाय राहणार नाहीत, असंही विनायक राऊत राणेंवर टीका करताना म्हणाले.
राजापूरची वाळवी ही पदवी राजन साळवी यांना मिळाली – विनायक राऊत
पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले,गद्दारी केल्याचे दुःख नाही.. नऊ वेळा गद्दारी केलेली सर्टिफिकेट आहेत, त्यांचं नाव राजन साळवी असं किरण सामंत म्हणाले आहेत. सगळे गद्दार सेनेमध्ये एकत्र झाले. विनायक राऊत यांच्या नावाने खापर फोडून फोडून तुमचा कपाळ मोक्ष होत आला आहे. राजापूरची वाळवी असा उल्लेख लोकप्रतिनिधींचा कधी झाला आहे का ? राजापूरची वाळवी ही पदवी राजन साळवी यांना मिळाली आहे. रिफायनरी प्रकल्प हवाय म्हणणारे राजन साळवी… रिफायनरीच्या दलालांकडून पावणेतीन कोटी रुपयांची दलाली राजन साळवी यांनी केली.
स्वच्छ विचाराच्या पक्षप्रमुखांना सोडून तुम्ही गद्दारांच्या गटात गेला. राजन साळवी यांच्या पीएनए तुमची कुंडली बाहेर काढली आहे. केलेलं पाप फार दिवस पचणार नाही. राजापूरमध्ये राजन साळवी यांनी केलेली गद्दारीही शेवटची…गद्दारांचे नेतृत्व राजन साळवी करत होते..स्वतः गद्दार बनायचं स्वतः बेईमान बनायचं मातोश्रीच्या सेवक असलेल्या विनायक राऊत वर तुम्ही दगड फोडता. टक्केवारी घेतली म्हणून बिळात जाऊन बसावं लागतं, असंही विनायक राऊत म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.