‘राजकारण्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव असतो’, नितीन गडकरीचं वक्

नितीन गडकरी: प्रत्येकाने चांगले काम करायला हवे. त्याचे श्रेय निश्चित मिळते. परंतु, राजकारण्यांच्या जवळचे कंत्राटदार, आर्टिटेक्ट यांना काम द्या, त्याला देऊ नका, असा सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव असतो. त्यावर मार्ग काढत चांगल्या दर्जाचे काम करायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari: ) यांनी केले. ते इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले, बांधकाम क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण दृष्टिकोन बाळगून कमी बांधकाम खर्चामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच किफायतशीर बांधकाम साहित्याचा वापर करून चांगले बांधकाम करायला हवे. बांधकाम क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. जे अधिकारी कामात हलगर्जी करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी बोलतना गडकरींना दिला आहे.

हल्ली लहान-सहान गोष्टींमुळे आम्हाला समाज माध्यमांवर ट्रोल केले जाते. एनएचआय आणि स्टेट पीडब्लूडीकडून मोठ मोठे रस्ते व पूल तयार केले जातात. परंतु येथील डायव्हर्शन रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीसह इतर समस्या बघायला मिळतात. आमच्या एनएचआयच्या एका अधिकाऱ्याला त्याबाबत विचारणा केल्यावर त्याने सरकारच्या रस्ते व डायव्हरर्शनबाबतच्या जीआरची माहिती दिली. त्यावर मी सुधारणा करण्यास सांगितले. मुंबई– गोवा महामार्गावरील डायव्हर्शनबाबत मी समाज माध्यमावर खूप शिव्या खाल्याचेही गडकरी म्हणाले. याप्रसंगी मंचावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, आयबीसीचे अध्यक्ष सी देबनाथ, आय. बी. सी. राज्य अध्यक्ष सुभाष चांदसुरे उपस्थित होते.

पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम

पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम केल्याचं गडकरींनी म्हटलं होतं, ऑटोमोबाईल उत्पादक आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) सारख्या संस्थांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत त्यांचे निष्कर्ष शेअर केले आहेत. तुमचा उद्योग ज्या पद्धतीने काम करतो, तसेच राजकारणही करते. सोशल मीडिया मोहीम पैसे देऊन करण्यात आली होती; ती मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी होती. त्यात काहीही तथ्य नाही; सर्व काही स्पष्ट आहे. (इथेनॉल मिश्रण) आयात पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी आहे, असे गडकरी म्हणाले. गडकरी पुढे म्हणाले की भारत जीवाश्म इंधन आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतो आणि विचारले की जीवाश्म इंधन आयात कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि भारतीय अर्थव्यवस्थेत वाचवलेले पैसे घालणे हे आर्थिकदृष्ट्या चांगले पाऊल नाही का. “आम्ही मक्का (मका) पासून इथेनॉल मिळवले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना 45 हजार कोटी रुपये मिळाले आहेत,” असे ते म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.