रेपो दरात कोणताही बदल नाही.

अर्थव्यवस्था सुस्थिर : रिझर्व्ह बँकेचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रेपो दर सध्याच्याच 5.25 टक्के या पातळीवर राखण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा दर आहे त्याच पातळीवर राहणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या संचालकमंडळाने एकमुखाने हा निर्णय शुक्रवारी घेतला. दोन दिवस सातत्याने चर्चा करुन या निर्णयाप्रत संचालक मंडळ पोहचल्याची माहिती देण्यात आली. भू-राजकीय स्थिती आव्हानात्मक असली, तरी तिला यशस्वीपणे तोंड देण्याइतका आत्मविश्वास भारताच्या अर्थव्यवस्थेत आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी मान्सून सरासरीपेक्षा कमी राहील असे अनुमान आहे. ते खरे ठरल्यास त्याचा विकास आणि महागाईसंबंधात परिणाम होणार आहे. तथापि, भारताकडे ही स्थिती निभावून देण्याइतका स्रोतांचा साठा आहे. त्यामुळे चिंतेचे कारण दिसत नाही. अर्थव्यवस्था सध्या समाधानकारक स्थितीत असून महागाई दरही विहित निकषांच्या अनुसार नियंत्रणात आहे, असे प्रतिपादन मल्होत्रा यांनी केले आहे.

जागतिक स्थिती आव्हानात्मक

रिझर्व्ह बँकेच्या मागच्या बैठकीपासून आत्ताच्या बैठकीपर्यंतच्या काळात आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिकच आव्हानात्मक झाली आहे. मध्यपूर्वेतील युद्ध थांबलेले नाही. महत्वाच्या वस्तूंच्या पुरवठा साखळ्या विस्कळीत स्वरुपातच आहेत. तरीही ग्राहकमूल्य निर्देशांक निर्धारीत लक्ष्यापेक्षाही कमी राहिला आहे. जागतिक स्थितीचा फारसा विपरीत परिणाम देशाच्या किंमत व्यवस्थेवर झालेला नाही. महागाई दरात वाढ झालेली वाढ झालेली असली तरी ती मर्यादेबाहेर नाही. पुरवठा  साखळ्यांची स्थिती विद्यमान वित्तवर्षाच्या चौथ्या तिमाहीपासून सुधारण्याची आशा आहे. तो पर्यंत धीर धरावा लागणार आहे. वाढत्या महागाईचा परिणाम लोकांच्या उत्पन्नावर होणे अपेक्षित आहे. या परिस्थितीवर सूक्ष्मपणे लक्ष ठेवावे लागणार आहे. मान्सूनचा पाऊस यंदा घटणार असल्याने त्या स्थितीशीही दोन हात करावे लागणार आहेत. तरीही अर्थव्यवस्था ही आव्हाने स्वीकारण्यास सक्षम आहे. सर्वसामान्य आर्थिक स्थिती  समाधानकारक आहे, अशी विधाने मल्होत्रा यांनी भाषणात केली.

विकासाचे भवितव्य

या आर्थिक वर्षात विकासदर किती राहील, हे महागाईची स्थिती कशी आहे, यावर अलंबून असेल. पुरवठा साखळ्या काहीकाळ तणावातच राहतील, अशी शक्यता आहे. तथापि, देशांतर्गत मागणीची स्थिती आणि वस्तू उत्पादन तसेच सेवा क्षेत्र यांचा विकासदर समाधानकारक राहणार आहे. उत्पादन आणि  सेवा क्षेत्रांचा विकासदर अधिक राहण्याची शक्यता आहे. मात्र, काही क्षेत्रांमध्ये विकासदर सौम्य राहण्याचीही शक्यता आहे, असे प्रतिपादन संजय मल्होत्रा यांनी भाषणात केले.

काय म्हणाले संजय मल्होत्रा…

ड 2025-2026 या आर्थिक वर्षात विकासदर 7.6 टक्के राहिला आहे

ड मार्च ते एप्रिल या काळात महत्वपूर्ण महागाई दर 3.7 टक्क्यांवर स्थिर

ड वर्ष 2026-2027 मध्ये ग्राहकमूल्य निदेर्शांक 5.1 टक्का राहणे शक्य

ड थेट विदेशी गुंतवणुकीतील वाढ विदेशी गुंतवणूदारांचे स्वारस्य दर्शवून देते

ड शेअरबाजारातून विदेशी पैसा बाहेर जात असला, तरी चलनसाठा भरपूर

ड गेल्या दोन महिन्यांमध्ये कच्च्या इंधन तेलाचे तर सरासरी 110 डॉलर्स

ड या आर्थिक वर्षात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तेलदर अधिक शक्य

Comments are closed.