अमरनाथ यात्रेसाठी पोलिसांनी ॲप लाँच केले.
जम्मू:
जम्मू-काश्मीर पोलिसांनी अमरनाथ यात्रेदरम्यान भाविक आणि पर्यटकांची सुरक्षा वाढविण्यासाठी ‘पहचान अॅप’ लाँच केला आहे. हा एक क्यूआर कोड आधारित अॅप आहे. या अॅपद्वारे यात्रामार्ग आणि पर्यटनस्थळी काम करणारे घोडेवाले, पिट्ठू, दुकानदार आणि अन्य सेवा पुरविणाऱ्या लोकांची नोंदणी करण्यात येणार आहे. क्यूआर कोड स्कॅन करून त्यांची पार्श्वभूमी पडताळली जाणार आहे. यामुळे संशयास्पद लोकांची ओळख पटविण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांचे सांगणे आहे.
Comments are closed.