भारताने वर्ल्डकप जिंकला..देशात सर्वत्र जल्लोष; Victory परेड होणार की नाही?, BCCI ने दिली मोठी म


टीम इंडिया महिला विश्वचषक विजय परेड नाही : भारताने महिला वनडे वर्ल्ड कप 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने इतिहास रचला. पण आता प्रश्न असा आहे की, पुरुष संघाप्रमाणेच महिला संघाचाही विक्ट्री परेड काढला जाणार का? याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या तरी बीसीसीआय विजय सोहळ्याबाबत कोणत्याही घाईत नाही.

4 नोव्हेंबरला आयसीसीची बैठक, बीसीसीआय सचिव दुबईला रवाना

आयसीसीची बैठक 4 नोव्हेंबरला दुबईमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया मुंबईहून दुबईकडे रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावर त्यांनी IANS शी बोलताना आपल्या दुबई दौर्‍यामागचं कारण सांगितलं आणि महिला संघाच्या विजय सोहळ्याबाबतही प्रतिक्रिया दिली.

महिला संघाचा विक्ट्री परेड होणार का?

सैकिया यांच्या म्हणण्यानुसार, सध्या तरी विजय सोहळ्याची कोणतीही अधिकृत योजना नाही. ते म्हणाले की, “मी सध्या आयसीसीच्या बैठकीसाठी दुबईला जात आहे. माझ्यासोबत इतर काही अधिकारी देखील आहेत. बैठक संपल्यानंतर भारतात परतल्यावरच महिला संघाच्या विजय सोहळ्याबाबत निर्णय घेतला जाईल.”

आयसीसीच्या बैठकीत उठणार आशिया कपचा मुद्दा

देवजीत सैकिया यांनी पुढे सांगितले की, ते आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा आयसीसीच्या बैठकीत मांडणार आहेत. त्यांना पूर्ण विश्वास आहे की भारताला आपली ट्रॉफी योग्य सन्मान आणि आदराने परत मिळेल.

भारताने पाकिस्तानचा पराभव करून जिंकला होता आशिया कप

भारताने 2025 च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले होते. मात्र, सामना संपल्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमुळे PCB आणि ACC चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊनच स्टेडियममधून निघून गेले. तेव्हापासून ती ट्रॉफी भारताला परत मिळालेली नाही, आणि सध्या हाच वाद मुख्य केंद्रस्थानी आहे.

हे ही वाचा –

धारावीची राधा, मोहालीची अमनजोत, सांगलीची स्मृती! वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताच्या 11 वाघिणींची कहाणी

आणखी वाचा

Comments are closed.