नोएडा हिंसाचार पाकिस्तान कनेक्शन?

परदेशी व्हॉटस्अप हँडलर्सकडून अफवांचे प्रसारण

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील नोयडा येथे सोमवारी झालेल्या कामगारांच्या उद्रेक घटनेचे पाकिस्तान कनेक्शन आता समोर येत आहे, असे प्रतिपादन नोयडा येथील पोलिसांनी केले आहे. किमान वेतनच्या वाढीसाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हिंसाचारी बनाविण्यासाठी पाकिस्तानातून व्हॉटस्अप हँडलर्सनी अफवा पसरविण्याचे काम केले, असा आरोप प्रशासनाने केला असून चौकशीला प्रारंभ झाला आहे.

हा हिंसाचार पूर्वनियोजित होता. कामगारांना भडकविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. हा हिंसाचार भावनेच्या भरात घडलेला नाही. ज्या पद्धतीने तो घडला, ती पाहता तो पूर्वनियोजित होता आणि त्यासाठी व्हॉटस्अपचा उपयोग करण्यात आला होता. तसेच कॉल सेंटर्ससदृश प्लॅटफॉर्मही बनविण्यात आल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती गौतम बुद्धनगर पोलिसांनी दिली आहे.

बनावट हँडल्सचा सुळसुळाट

या हिंसाचार घडण्यापूर्वी तीन चार दिवस आधी अनेक बनावट ‘एक्स’ आणि व्हॉटस्अप हँडल्स निर्माण करण्यात आली होती. अशा 50 हून अधिक हँडल्सवरुन प्रक्षोभक संदेश पसरविण्यात आले. काही कामगारांची माथी भडकविण्यचे काम या हँडलर्सनी केले. त्यामुळे शांततापूर्ण पद्धतीने चाललेली निदर्शने अचानक हिंसक बनली, असे आढल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांवर हल्ले करण्याची चिथावणी

व्हॉटस्अप एक संदेश फिरविण्यात आला असून त्यात पोलिसांवर हल्ले करण्याची चिथावणी देण्यात आली आहे. एकत्र जमून पोलिसांवर दगडफेक करा, असा संदेश पसरविण्यात आला. ‘उद्या आपण सर्वांनी पोलिसांवर हल्ला करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. पोलिसांवर लाठीहल्ला करण्याची योजना आहे, असे या संदेशता स्पष्ट करण्यात आले होते. इन्स्टाग्रॅमवरुन प्रसारित करण्यात आलेल्या एका संदेशात दंगलखोरांना मोठ्या प्रमाणात मिरची पूड घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले होते. हे संदेश वेगाने पसरविण्यासाठी अनेक व्हॉटस्अप गटांची आणि इतर सोशल मिडिया गटांची रातोरात स्थापना करण्यात आली, असे दिसून येत आहे. सायबर पोलिसांनी आता या हँडलर्सचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे.

बुरखाधारींकडून दंगल

आंदोलन करणाऱ्या कामगारांमध्ये काही बुरखाधारी घुसविण्यात आल्याचे दिसून येत आहे. चेहरा झाकलेल्या या दंगलखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत. हिंसाचाराचे व्हिडीओ चित्रण होऊ नये, असे कारस्थान करण्यात आले आहे. या नियोजनबद्ध आणि पकिस्तानाशी संबंध असलेल्या कारस्थानाला अर्थपुरवठा कोणी केला, याचाही शोध घेतला जात असून खरे सूत्रधार लवकरच समोर येतील, असा विश्वास नोयडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कामगारांना आणि त्यांच्या संघटनांना पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बनावट मिडिया हँडल्सचा सुळसुळाट

ड अनेक बनावट मिडिया हँडल्सवरुन आंदोलनकर्त्या कामगारांना चिथावणी

ड शांततेत आंदोलन करणाऱ्या कामगारांमध्ये घुसविले बुरखाधारी दंगलखोर

ड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चेहरा झाकलेल्या दंगलखोरांकडून केलाr गेली मोडतोड

ड गौतम बुद्ध नगर पोलिसांकडून पूर्वनियोजित कारस्थानाच्या चौकशीला प्रारंभ

Comments are closed.