अण्वस्त्रे सोडण्यास उत्तर कोरियाचा नकार
उत्तर कोरियाने अण्वस्त्रे सोडण्यास पुन्हा एकदा नकार दिला आहे. किम जोंग उन यांची बहीण किम यो-जोंग यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, उत्तर कोरिया आपली अण्वस्त्रे कायम ठेवेल. ही शस्त्रे देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत. अण्वस्त्रे सोडण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना किम यो यांनी ‘मूर्खपणाचे कृत्य’ असे म्हटले. किम यो-जोंग यांचे हे वक्तव्य व्हिएन्नामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेदरम्यान आले.
Comments are closed.