'यशवीर' वर मदार येतो
नीरज चोप्रा दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडल्याने हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. नीरजच्या अनुपस्थितीत त्याची जागा ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता भालाफेकपटू यशवीर सिंह घेणार आहे. हिंदुस्थानी ऍथलेटिक्स महासंघाने गुरुवारी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 77 सदस्यीय ट्रक ऍण्ड फील्ड संघ जाहीर केला. आयची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रा आपल्या जेतेपदाचा बचाव करणार होता. त्याने 2018 आणि 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीचे सुवर्णपदक पटकावले होते, मात्र दुखापतीने त्याच्या मोहिमेला ब्रेक लावला. नीरजच्या जागी यशवीर सिंह आणि रोहित यादव हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करतील. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून यशवीरने आपली दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे नीरजच्या अनुपस्थितीत भालाफेकीत हिंदुस्थानच्या पदकाच्या आशा आता यशवीरवर असतील.
Comments are closed.