बापाने 70 हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही; आता पार्थ पवारांवर ‘मुळशी पॅटर्न 2’ चित्रपट बनवा
Parth Pawar Land: महाराष्ट्राच्या राजकारणात एका जमिनीच्या खरेदी व्यवहार (Parth Pawar Land) प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेलीजमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर (Parth Pawar Land) केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळे सरकारी नियमांना पायदळी तुडवत जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला, या प्रकरणी राजकीय वातावरण (Parth Pawar Land) तापल्याचं दिसून आलं, त्यानंतर हा जमिनीच्या खरेदीचा व्यवहार रद्द करत येत असल्याचं अमेडिया कंपनीने जाहीर करत तसं पत्र संबंधित विभागाला दिलं, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे, दरम्यान या संपूर्ण घटनेवर चित्रपट बनवा अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे. पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा, असं हाकेंनी म्हटलं आहे. (Parth Pawar Land)
पार्थ पवार जमीन : लक्ष्मणाकडे नक्की आहे का?
लक्ष्मण हाकेंनी सोशल मिडीया फेसबुकवरती पोस्ट लिहून म्हटलंय की, १८०० कोटींची महार वतनाची जागा ३०० कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारने केलं. आई वडीलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवार व सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील ३ एकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारच्या नावे केले, बारा खडी शिकायच्या वयात सातबारा फिरवण्याची कला पार्थ पवारांना शिकवण्यात आली असं म्हणत त्यांनी अजित पवारांसह पार्थ पवारांवर टीका केली आहे..
तर पुढे हाके म्हणताता, बापाने ७० हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार १५०० कोटींच्या घोटाळ्यात सापडले. ‘नया है वह’ म्हणत त्यांना सोडूनच दिले जाईल. नवा जमिन घोटाळा करताना पार्थ पवारांनी जुन्या चुका करु नयेत,
उदा.
-एक लाख रुपये भागभांडवल असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ३०० कोटींचा व्यवहार करु नये.
-शेकडो कोटींचा व्यवहार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करु नये.
-सरकारी खात्याची जमिन खासगी कंपनीकडे घेताना अधिकची काळजी बाळगावी.
-भविष्य काळात मरिनड्राईव्ह, ताज हॉटेल, मलबार हिल्स, विधानभवन अशा जागांवर हात मारावा. किरकोळ महार वतनांच्या. जमिनींकडे दुर्क्ष करावे.
प्रत्येकाकडे कला असते. पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी आहे. त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावं. भविष्यात १५, २० हजार कोटींच्या जमिन खरेदीचा घोटाळा करावा.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेची शिखरं गाठली ती दलित, मुस्लीम,ओबीसी, उपेक्षित घटकांच्या नरडीवर टाच ठेवून. पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव हे आहे की सरंजामी पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे. पार्थ पवारने महार वतनाची जमिन कंपनीच्या नावे केली तेव्हा जणांना उचलून आणलं? किती लोकांच्या अनात माती कालवली नेमकं या प्रकरणात काय काय घडलं असेल याचं सत्य महाराष्ट्रा पुढे येईल असे वाटत नाही, असंही लक्ष्मण हाके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.