हाय-स्पीड इव्होल्गा ट्रेनसाठी रशियाकडून ऑफर
ट्रान्समॅशहोल्डिंग कंपनीकडून तंत्रज्ञान हस्तांतरणाचा प्रस्ताव : आधुनिक रेल्वेजाळ्याकरता सहकार्याची तयारी
रशियाने भारताला इवोल्गा हायस्पीड रेल्वे तंत्रज्ञानाची ऑफर दिली आहे. 360 किलोमीटर प्रतितासाचा वेग आणि 80 टक्के स्थानिक सामग्रीच्या वापराचा हा प्रस्ताव रशियाकडून देण्यात आला आहे. वंदे भारत स्पीलर करारानंतर हा मेक इन इंडिया आणि हायस्पीड रेल्वे लक्ष्यांशी निगडित प्रस्ताव आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारत स्वत:च्या रेल्वे व्यवस्थेला आधुनिक करण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. हायस्पीड रेल्वे प्रकल्प देशाच्या प्राथमिकतेत सामील आहसे. याचदरम्यान रशियन कंपनी ट्रान्समॅशहोल्डिंगने भारताला स्वत:च्या इवोल्गा हायस्पीड रेल्वे तंत्रज्ञानाची ऑफर दिली आहे. हा प्रस्ताव इनोप्रोम डॉट इंडिया कार्यक्रदरम्यान मांडण्यात आला आहे. इवोल्गा रेल्वे 360 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावू शकते. 8 डब्यांच्या संचलात 642 प्रवासी सामावू शकतात आणि यात 80 टक्के स्थानिक सामग्रीचा वापर शक्य आहे. हा प्रस्ताव भारत-रशियाच्या वर्तमान रेल्वेसहकार्याला वाढविणारा ठरू शकतो.
ट्राउन्समॅशहोल्डिंग पूर्वीच भारतात सक्रीय आहे. कंपनीने वंदे भारत स्लीपर रेल्वेंच्या निर्मितीसाठी संयुक्त उपक्रमाद्वारे 6.5 अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. याच्या अंतर्गत 120 रेल्वेगाड्या तयार केल्या जाणार आहेत. या अनुभवाच्या आधारावर रशिया आता हायस्पीड श्ा़sdरणीतही पाऊल ठेवू इच्छित आहे. मुंबई-अहमदाबाद यासारख्या कॉरिडॉरमध्ये हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.
इवोल्गा रेल्वेची वैशिष्ट्यो
इवोल्गा रशियात विकसित आधुनिक रेल्वे आहे, ही रेल्वे शहरी आणि आंतरशहरीय सेवांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, परंतु हायस्पीड वर्जनमध्ये याचा वेग 360 किलोमीटर प्रतितासापर्यंत पोहोचू शकतो. 8 डब्यांचा संच प्रवासी क्षमतेसाठी पुरेसा आहे. वापराचा दीर्घ कालावधी आणि कमी देखभाल खर्च यामुळे ही रेल्वेगाडी आकर्षक पर्याय ठरते. सर्वात महत्त्वपूर्ण बाब 80 टक्के स्थानिक सुट्या भागांची आहे. यामुळे मेक इन इंडिया पुढाकाराला थेट लाभ होणार आहे. तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्थानिक उत्पादनामुळे भारतीय उद्योगाला नवी क्षमता प्राप्त होईल. भारत वर्तमानात सेमी हायस्पीड वंदे भारत रेल्वेंवर लक्ष व्रेंद्रीत करत असून त्या 160-180 किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठू शकतात. पूर्ण हायस्पीड नेटवर्कसाठी बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
जपानी शिंकानसेन तंत्रज्ञान मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरसाठी निवडण्यात आले आहे. रशियाचा प्रस्ताव या क्षेत्रात भारतासमोरील पर्याय वाढवू शकतो. खासकरून खर्च आणि स्थानिक निर्माणाच्या प्रकरणी हा प्रस्ताव उपयुक्त ठरू शकतो.
भारत-रशिया रेल्वे सहकार्य
भारत आणि रशियादरम्यान रेल्वे क्षेत्रात जुने सहकार्य राहिले आहे. ट्रान्समॅशहोल्डिंगचा वंदे भारत स्लीपर प्रकल्प याचे नवे उदाहरण आहे. लातूर येथील प्रकल्पात याचे उत्पादन सुरू झाले आहे. भारतीय इंजिनियर्सना रशियात प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. या संयुक्त उपक्रमाने दोन्ही देशांचे औद्योगिक संबंध मजबूत केले आहेत. आता इवोल्गासारख्या प्रगत तंत्रज्ञानाची ऑफर याच सहकार्याचा विस्तार आहे. इनोप्रोम डॉट कॉम इंडिया यासारख्या व्यासपीठावर ही चर्चा होणे स्वाभागि आहे. तेथे औद्योगिक आणि तांत्रिक भागीदारीवर जोर देण्यात येतो. रशिया भारताला केवळ तयार रेल्वेगाड्या विकण्यास इच्छुक नसून संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान पुरविण्यास देखील तयार आहे. यामुळे भारताची आत्मनिर्भरता वाढेल आणि निर्यात क्षमताही विकसित होऊ शकते.
आव्हाने अन् शक्यता
हायस्पीड रेल्वे प्रकल्पात सुरक्षा, ट्रॅक सुविधा आणि सिग्नलिंग सिस्टीम सर्वात महत्त्वपूर्ण असते. केवळ रेल्वेगाड्या आणणे पुरेसे नाही, पूर्ण कॉरिडॉरला हायस्पीडच्या अनुकूल तयार करावे लागते आणि खर्चही अधिक असतो. जपानी तंत्रज्ञानासोबत तुलनेत रशियाची ऑफर किती प्रतिस्पर्धी आहे हे पहावे लागणार आहे. वर्तमान वंदे भारत अनुभवातून शिकून प्रक्रियेला वेग दिला जाऊ शकतो.
Comments are closed.