शिवसेनेच्या शिरपेचात मानाचा तुरा; ओम बिर्ला यांच्याकडून दोन खासदारांची मोठी जबाबदारी

श्रीकांत शिंदे: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्याकडून शिवसेनेच्या दोन खासदारांची आंतरराष्ट्रीय मैत्री गटामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची भारत – इंडोनेशिया संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर आउटरिच या सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यशस्वी नेतृत्व केले होते त्यांनतर केंद्र सरकारने पुन्हा एकदा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तर खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांचा भारत – अमेरिका संसदीय मैत्री गटाचे सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवल्या गेल्याचे बोललं जात आहे.

Shrikant Shinde : भारत – इंडोनेशिया संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी निवड

लोकसभेसाठी दोन्ही 18व्या संसदीय मैत्री गटांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, प्रफुल पटेल, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे यांचा सहभाग असून या सर्वपक्षीय खासदार गटाचे नेतेपद सुप्रिया सुळेंकडे असणार आहे. परिणामी सिंगापूर देशात जाणाऱ्या खासदार गटाचे नेतृत्व या सुप्रिया सुळे करणार आहेत. तर इंडोनेशियात जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतेपद श्रीकांत शिंदेंकडे असणार आहे. तसेच अर्जेंटिनाला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अशोक चव्हाण हे करणारा असल्याची माहिती आहे. दरम्यान, ब्राझीलला जाणाऱ्या शिष्टमंडळाच्या नेतेपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. मोरोक्कोला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अरविंद सावंत हे करणार आहे. दुसरीकडे, केनियाला जाणाऱ्या शिष्टमंडळात नरेश मस्के आणि संजय राऊत हे एकत्र असणारा आहे. तर चिलेला जाणाऱ्या शिष्टमंडळात रवींद्र वायकर यांचा समावेश करण्यात आला आहे. तर वर्षा गायकवाड, श्रीरंग बारणे बाल्टिक्स देशांचा दौरा करणाऱ्या शिष्टमंडळात असणार आहेत.

संसदीय मुत्सद्दीपणा: विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश

यात विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी काँग्रेसचे शशी थरूर (फ्रान्स), पी. चिदंबरम (इटली), के. सी. वेणुगोपाल (पोर्तुगाल), मनीष तिवारी (ऑस्ट्रेलिया) आणि गौरव गोगोई (फिलिपिन्स), डीएमकेच्या के. कनिमोळी (ग्रीस), तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ’ब्रायन (चिली) आणि अभिषेक बॅनर्जी (अल्जेरिया), शिवसेना-यूबीटीचे अरविंद सावंत (मोरोक्को)

राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (सिंगापूर), एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी (ओमान), समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव (जपान) आणि राम गोपाल यादव (इजिप्त), आम आदमी पक्षाचे संजय सिंह (कॅरिबियन देश) तसेच आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन (मादागास्कर) हे संबंधित गटांचे अध्यक्ष असतील.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.