तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट…. महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या
ओंकार तरमळे IPL 2026 लिलाव : 16 डिसेंबर 2026 रोजी झालेल्या आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडूच्या आयुष्याला नवी दिशा दिली. प्रत्येक युवा खेळाडूचं स्वप्न असते, आयपीएल खेळण्याचे, आणि या वर्षी भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या काही नवोदित खेळाडूंवर फ्रँचायझींनी विश्वास दाखवला. त्यामागील फळ म्हणजे या खेळाडूंना अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम देऊन खरेदी केले गेले. महाराष्ट्रच्या शहापूर तालुक्यातील शेरेसारख्या ग्रामीण भागातून आलेला खेळाडू ओंकार तारमळे याला आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने घेतले. सनरायझर्स हैदराबादने (SRH) त्याला 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले.
बापाची जिद्द,अन् पोराचे कष्ट…
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ खास लक्षवेधी आहे. यात ओंकारचे वडील तुकाराम तारमळे आपली खुर्ची सोडून उड्या मारत, आपल्या मुलाच्या यशाबद्दल देवाचे आभार मानताना दिसतात. त्यांच्या आयुष्यात हे फक्त क्रिकेटची निवड नाही, तर वर्षानुवर्षे केलेल्या संघर्षाची खरी जिंकणारी क्षण होती. वडिलांच्या पाठिंब्याचा खंबीर हात आणि अटळ प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय नशिबालाही झुकावं लागतं, हे शहापूर तालुक्यातील शेरे गावच्या सुपुत्राने सिद्ध केलं आहे.
शेरेसारख्या ग्रामीण भागातून येऊन थेट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयपीएल मंचावर स्थान मिळवणं सोपं नाही. स्थानिक स्पर्धांमधील त्याची अष्टपैलू कामगिरी आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे हे फळ असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. आता ओंकार ऑरेंज आर्मीच्या जर्सीमध्ये मैदानात उतरून शहापूरचा नाद संपूर्ण जगभर पोहोचवण्यासाठी सज्ज झाला आहे.
ओंकारचे वडील तुकाराम तारमळे काय म्हणाले?
ओंकारचे वडील तुकाराम म्हणाले की, “आमची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की, मी माझ्या मुलाच्या स्वप्नांना पंख देऊ शकेन. दिल्ली आणि त्रिपुरात खेळण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून 3 लाखांचे कर्ज घेतलं. आज त्याची मेहनत रंगाला आली आणि देवाने त्याला त्याचे फळ दिले.”
ओंकार तारमळे काय म्हणाला?
विशेष गोष्ट म्हणजे, जेव्हा ऑक्शन सुरू होते आणि अनेक दिग्गज खेळाडूंसाठी मोठ्या बोली सुरू होत्या, तेव्हा ओकार टीव्हीच्या समोर नव्हता, तर मंदिरात बसून प्रार्थना करत होता. त्याने सांगितले, “मी फक्त शांत बसून प्रार्थना करत होतो.” जेव्हा SRH ने अंतिम क्षणात त्यात रस दाखवला. तो म्हणाला, खरंतर, मला क्रिकेट सोडायचं होतं, मी विचार केला होता त्या गोष्टीबद्दल. पण शेवटी मला वाटलं मी करून दाखवेल म्हणून मी जरा घरच्यांना बोललो की मला अजून एक चान्स हवा आहे. ग्रामीणांनी ओंकार आणि त्याच्या कुटुंबाचा सन्मान करत ढोल-नगाड्यांसह हा आनंद साजरा केला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.