स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीजवळ गोळीबार; एक जण ठार, 5 जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उत्तर स्वित्झर्लंडमधील एका रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी दुपारी 3 ते रविवारी पहाटे 2 या वेळेत ही रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला सुमारे 3500 लोकांनी हजेरी लावली होती. ज्या रेसकोर्सवर हा कार्यक्रम आयोजित केला होता, तिथेच हा गोळीबार झाला. हा गोळीबार कुणी आणि कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Comments are closed.