अजितदादांना नरेंद्र मोदी अन् अमित शाहाच न्याय देऊ शकतात, VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांच
दिल्ली: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर यातील काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज पुन्हा एकदा नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेत आहेत. रोहित पवारांनी (Rohit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाविषयी केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) आजही एका सादरीकरणाद्वारे अजित पवारांच्या मृत्यूविषयी नवे पुरावे, तांत्रिक माहिती व तपासासाठी काही महत्त्वाचे खुलासे करत आहेत. यावेळी रोहित पवारांनी म्हटलं की, आम्ही मुंबईत एक छोटं प्रेसजेंटेशन केलं होतं. पण यात जितकं सखोल काम केलं तसं लक्षात आलं की, व्हीएसआर या कंपनीच्या पाठीशी खूप मोठे लोक आहेत. सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणारे काही लोक या कंपनीच्या पाठीशी आहेत. या अपघातात व्हीएसआर जबाबदार आहे, तर त्यांना वाचवणे कटाचा भाग असू शकतो. नरेंद्र मोदी आणि अमित शाह फक्त हेच अजित पवारांना न्याय देऊ शकतात असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.(Ajit Pawar)
व्हीएसआर (VSR) नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान असू शकते आणि डीजीसीएचे मोठे अधिकारीही यामागे आहेत. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीच या तपासात लक्ष दिले पाहिजे, कारण यात गुंतलेले इतर लोकही तितकेच प्रभावशाली आहेत. मी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही विनंती करतो की, त्यांनी हा विषय आपल्या हाती घ्यावा आणि नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आम्हाला साथ द्यावी, अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.
मंत्री राम नायडूंनी सुरुवातीलाच लिअर जेटला क्लीन चीट देणारं स्टेटमेंट केलं. नंतर सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली की व्हीएसआर सोबत काही संबंध नाही. ज्यांनी व्हीएसआरला लोन दिलं ते तेलगू देसम पक्षाशी संबंधित आहेत, अशी माहिती देखील रोहित पवारांनी दिली आहे.
रोहित पवारांनी त्यांना ट्रोल करणाऱ्यांवर केलं भाष्य
रोहित पवार यांनी नुकतेच या प्रकरणी त्यांच्यावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सचा खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. आम्हाला जे ट्रोल करत आहेत, जे भाजपासाठी काम करतात, ते खूप जास्त अग्रेसिव्ह झालेले आहेत, आम्ही जेव्हापासून प्रेझेंटेशन चालू केले तेव्हापासून ते भडकले आहेत, एअरपोर्ट कडून त्यांना माहिती मिळत आहे. मी कोणत्या फ्लाईटने गेलो होतो, माझ्यासोबत कोणता सेलिब्रिटी होता त्यांच्या आणि माझ्या आधार कार्डची माहिती त्या ट्रॉलर्स न मिळत आहे. मी जेव्हा दिल्लीत आलो होतो तेव्हा मी स्वतः सांगितलं होतं मी देखील व्हीएसआर च्या विमानाने फिरलेलो आहे, माझ्यासोबत एक सेलिब्रिटी होता, मी ही माहिती दिली तरी देखील भाजपचे जे ट्रोलर्स आहेत ही माहिती त्यांना कोणी दिली, आरटीआय टाकून देखील आम्हाला माहिती मिळत नाही, कोणते अधिकारी आम्हाला माहिती देत नाहीत, पण एअरपोर्ट प्रशासन अशा ट्रोलर्स ना सर्व माहिती का देत आहे असा आमचा प्रश्न आहे, या ट्रोलर्सच्या मागे नेमकं कोण आहे या सगळ्यात जाऊन मी तुमचा सर्वांचा वेळ घेणार नाही, पण अशा पद्धतीने भाजपचे काही मोठे ट्रोलर्स आम्हाला ट्रोल करत आहेत आमच्या पत्रकार परिषदेला ट्रोल करत आहेत, तर मला वाटतंय की हा सर्व रिसर्च आणि सर्व माहिती दाबण्याचा प्रयत्न करत आहे की, यामध्ये दुसरा कोणता अँगल आहे असा प्रश्न लोकांच्या देखील मनामध्ये येत आहे असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.