एलईडी दिवे लावून मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई, मत्स्य विभागाचे ऑपरेशन निशाचर
एलईडी दिवे लावून रायगड जिल्ह्यातील काही नौका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारी बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांवर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाने ‘ऑपरेशन निशाचर’ अंतर्गत कारवाई केली आहे. एक नौका पकडली असून दोन नौकांवरील एलईडी दिवे उध्वस्त करण्यात आल्या आहेत.
मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री कारवाई करत रायगड जिल्ह्यातील एकवीरा दर्शन ही नौका पकडली आहे. दापोली तालुक्यातील आंजर्ले किनारपट्टीसमोर ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करत असताना रायगड जिल्ह्यातील दोन नौका एलईडी लावून मासेमारी करताना आढळल्या.त्यांचा पाठलाग करताना नौकांवरील एलईडी दिवे नष्ट करण्यात पथकाला यश आले. ही कारवाई सहायक आयुक्त जीवन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी चिन्मय जोशी, परवाना अधिकारी गुहागर स्वप्नील चव्हाण, परवाना अधिकारी साखरीनाटे पार्थ तावडे, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक पुरुषोत्तम घवाळी आणि सागरी सुरक्षा रक्षक सचिन सुद यांनी केली .
मुंबईतून गस्ती नौकेला प्राचारण
सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती नौका कार्यरत नसल्यामुळे कारवाई करण्यात अडचणी येत होत्या. अखेर ऑपरेशन निशाचर नधील कारवाईसाठी मुंबई येथून गस्ती नौका प्राचारण करण्यात आली.
Comments are closed.