‘ऑपरेशन सिंदूर’ला विरोध, केरळच्या तरुणाला नागपुरातून अटक; मोठं कनेक्शन उघड होण्याची शक्यता

भारत पाकिस्तान युद्ध लाइव्हः माओवाद्यांना पाकिस्तान विरोधात राबवले जात असलेले “ऑपरेशन सिंदूर” (Operation Sindoor) पचनी पडत नाही आहे का? असा सवाल नागपुरातील एका घटनेमुळे निर्माण झाला आहे. लष्करातील जवान जीवाची बाजी लावून ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवत असताना नागपुरात केरळच्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक आणि अत्यंत संतापजनक बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपीच्या मोबाईलमधून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) विरोधात अत्यंत आक्षेपार्ह लिखाण सापडल्यामुळे नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) त्याला अटक केली आहे. रजास सिद्दीक असे या 26 वर्षीय आरोपीचे नाव असून तो केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याचा रहिवासी आहे. नुकतच दिल्लीत झालेल्या एका सेमिनारमध्ये सहभागी झाल्यानंतर रजास सिद्दिक केरळला परत जाताना नागपुरात थांबला होता. मात्र, त्याच्या मोबाईलमध्ये ऑपरेशन सिंदूर तसेच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन कगार (Anti Naxal Operation Kagar) विरोधात अत्यंत आक्षेपार्ह लिखाण असल्याची गोपनीय माहिती गुप्तहेर  संस्थांकडून पोलिसांना मिळाली होती.त्या आधारे नागपूर पोलिसांनी काल रात्री मारवाडी चौक परिसरातल्या एका हॉटेलमध्ये धाड टाकून रजास सिद्दिक ला अटक केली आहे.

भारत सरकार आणि भारतीय सैन्यविरोधात द्वेष, पाकिस्तानला समर्थन

पुढे आलेल्या माहितीनुसार, रजासच्या मोबाईल फोनमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन कगार विरोधात आक्षेपार्ह मजकूर तर आढळलेच आहे. शिवाय त्याच्या जवळ सीपीआय माओवादी या नक्षलवाद्यांच्या प्रतिबंधित संघटने संदर्भातले आक्षेपार्ह लिखाण, काही आक्षेपार्ह पुस्तके, तसेच भारत सरकार आणि भारतीय सैन्यविरोधात द्वेष निर्माण होईल अशा सोशल मीडिया पोस्टही आढळल्या आहेत. इंस्टाग्रामवर तर रजासने ऑपरेशन सिंदूर संदर्भात आक्षेपार्ह पोस्टही केल्याचे दिसून आले आहे. “ऑपरेशन सिंदूर मानवते विरोधात हल्ला आहे” असा पाकिस्तानला समर्थन करणारा मजकूर ही रजासच्या मोबाईलमधून पोलीस आणि अँटी नक्सल ऑपरेशनच्या तपास पथकाला मिळाल्याची खात्रीलायक माहिती आहे. सध्या नागपूर पोलीस आणि अँटीनक्सल ऑपरेशनचे पथक रजासची कसून चौकशी करत आहे.

पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटला?

– भारतावर ड्रोन हल्ले केले, पण सगळे अपयशी ठरले
– लढाऊ विमाने पाठवली, एकही यशस्वी झालं नाही
– चार लढाऊ विमाने भारताने लगोलग पाडली
– कराची पोर्ट उद्ध्वस्त
– राजधानी इस्लामाबादेत हल्ले
– पंतप्रधानाच्या घराबाहेर हल्ले, बंकरमध्ये लपण्याची वेळ
– लाहोरमधील हल्ल्यांनी लाज काढली
– पाक सैन्यप्रमुखावरच देशद्रोहाचा खटला
– बलुचिस्तानने पाकिस्तानच्या 3 भागांवर कब्जा केला
– बलुचिस्तानातील चौक्या सोडून पळून जाण्याची वेळ

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.