लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या नावाखाली मोठं कांड; शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या बहा

जळगाव: राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेमुळे चर्चेत आहे. मात्र, याच प्रक्रियेचा फायदा घेत जळगावात एका नराधमाने महिलांच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Jalgaon Crime News) आला आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांकडे शरीरसुखाची आणि प्रेमसंबंधाची मागणी केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)

Jalgaon Crime News : नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सध्या ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या महिलांचे केवायसी अपूर्ण आहे, त्यांचे पैसे तात्पुरते बंद झाले आहेत. याचाच फायदा घेत आरोपी गोकुळ चव्हाण याने एका महिलेला गाठले. ई-केवायसी करून देतो, असे सांगत तो पीडित महिलेच्या घरी गेला. त्याने महिलेकडून आवश्यक कागदपत्रे घेतली आणि काम करण्याच्या बदल्यात थेट शरीरसुखाची मागणी केली. या अनपेक्षित मागणीमुळे महिला हादरली, मात्र तिने धीर न गमावता पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. (Jalgaon Crime News)

Jalgaon Crime News : दुसऱ्या महिलेकडेही प्रेमसंबंधाची मागणी

आरोपी चव्हाण याचे कारनामे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्याने अन्य एका महिलेला तिचे बंद पडलेले ‘निवृत्ती वेतन’ पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवले. निवृत्ती वेतन सुरू करण्याच्या मोबदल्यात त्याने या महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केली. शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी महिलांकडे अशा प्रकारे अश्लील मागणी केल्याने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (Jalgaon Crime News)

जळगाव क्राईम न्यूज : पोलिसात गुन्हा दाखल

पीडित महिलांच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी गोकुळ चव्हाण याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या नराधमाने आणखी किती महिलांना अशा प्रकारे त्रास दिला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Jalgaon Crime News : ई-केवायसीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

दरम्यान, राज्य सरकारने तांत्रिक अडचणी लक्षात घेता ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या महिलांचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत किंवा केवायसी बाकी आहे, त्यांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत पोर्टल किंवा शासकीय केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Rohini Khadse: याप्रकरणी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे संतापल्या

लाडकी बहिण योजनेच्या E-KYC साठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. स्वतःची पाठ थोपटून घेण्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर आपले याकडे लक्ष आहे का ? असा सवाल त्यांनी थेट मंत्र्यांना केला आहे. रोहिणी खडसे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, आमच्या जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेची E-KYC करण्यासाठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी करण्याचे दोन धक्कादायक प्रकरण घडले आहेत. मंत्री महोदय आदिती तटकरे, स्वतःची पाठ थोपटून घेण्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर आपले याकडे लक्ष आहे का ?

एकनाथ शिंदे भाई, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने ‘लाडकी बहिण योजना’ आणली. तेव्हा मतांसाठी सरसकट महिलांना या योजनेचे पैसे देण्यात आले. आता मतदान मिळाल्यानंतर मात्र योजनेसाठी विविध अटी, शर्ती लावल्या जात आहे. ही E-KYC करत असताना महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कुठे बँक खात्याची अडचण येत आहे, कुठे मोबाईल नंबरची, काही महिलांचे तर सर्व कागदपत्रांची जुळणी झाली असताना त्यांना या योजनेतून बाद केले जात आहे. यामुळे महिलांची प्रचंड धावपळ होत आहे. यात काही राक्षसी वृत्तीचे लोक डाव साधतात. यात तात्काळ लक्ष घालून लवकरात लवकर योग्य कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.