दहशतवादी हल्ल्यादरम्यान गुगलवर चुकीनही ‘हे’ Search करु नका…, अन्यथा होईल तुरुंगवास; जाणून घ्य
दहशतवादी हल्ल्यानंतर Google वर या गोष्टी शोधू नका: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला (Pahalgam Terror Attack) केला. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत सरकारनं आक्रमक पावलं उचलत मोठे निर्णय घेतले आहेत. भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. या शिवाय पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. मात्र, भारत अजून आक्रमकपणे उत्तर देईल अशी पाकिस्तानला भीती वाटत आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. या काळात, तुम्हाला खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे. या काळात, तुम्ही गुगलवर काही गोष्टी शोधणे टाळावे. अन्यथा पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. तुम्ही कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घ्या…
बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ बनवण्याच्या पद्धतीबद्दल-
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. लष्कराने दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्यानंतर गुगलवर काही गोष्टी शोधू नयेत. अन्यथा पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. जर तुम्ही गुगलवर बॉम्ब किंवा कोणत्याही प्रकारची स्फोटक सामग्री बनवण्याच्या पद्धतीबद्दल सर्च केले तर त्यामुळे तुम्ही सुरक्षा एजन्सींच्या रडारवर येऊ शकता. या गोष्टी संवेदनशील आहेत. अशा परिस्थितीत, सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात आणि अटक देखील करू शकतात.
शस्त्रे आणि दहशतवादी संघटनांचा शोध-
दहशतवादी हल्ल्यानंतर तुम्ही शस्त्रे आणि दहशतवादी संघटनेबाबत गुगलवर सर्च करु शकत नाही. तुम्ही दहशतवाद्यांच्या विचारसरणीबाबत सर्च केले, दहशतवादी कशी तयारी करतात, याचे व्हिडीओ गुगलवर पाहिल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
हल्ल्याचे ठिकाण-
जर तुम्ही दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी राहत नसाल, पण तुम्हाला हल्ल्याच्या ठिकाणाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्ही गुगलवर अधिक सर्च केल्यास तुमच्याकडे संशयित म्हणून पाहिले जाऊ शकते आणि यासाठी सुरक्षा एजन्सी तुमची चौकशी करू शकतात.
पाकिस्तानच्या लोकांनी गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च केलं?
भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या संदर्भात काश्मीर, मोदी, पुलवामा आणि जम्मू सारखे कीवर्ड ट्रेंडिंगमध्ये आहेत. पोप फ्रान्सिस यांचे नावही चर्चेत आहे. याशिवाय, बॉलिवूड आणि आर्मीसारखे शब्द नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर आपले स्थान टिकवून आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानमध्ये लोक गुगलवर या हल्ल्याशी संबंधित ‘पहलगाम’ आणि ‘पहलगाम हल्ला’ असे कीवर्ड देखील शोधत आहेत. या हल्ल्याबाबत शेजारील देशात अस्वस्थता आणि अशांतता आहे हे स्पष्ट आहे.
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.