11 वर्षांनंतर मानहानीकारक पराभव अन् पाकिस्तानचे रडगाणे सुरू… थेट ICC कडे तक्रार, शेवटच्या षटक

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान तिसरी वनडे : टी-20 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh Beats Pakistan) वनडे मालिकेत पाकिस्तानला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. वर्ल्डकपनंतर पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता, जिथे दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे, बांगलादेशने तब्बल 11 वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका जिंकली आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा पराभव अत्यंत लाजिरवाणा मानला जात आहे.

दरम्यान, तिसऱ्या वनडेमधील शेवटच्या षटकात घडलेल्या वादग्रस्त डीआरएस निर्णयाबाबत पाकिस्तान संघाने मॅच रेफरी नीयामुर राशिदकडे तक्रार केली आहे. ऑन-फिल्ड अंपायर कुमार धर्मसेना याने सेकंड-लास्ट चेंडूवर बांगलादेशला रिव्ह्यू घेण्याची परवानगी दिल्याने हा वाद निर्माण झाला.

क्रिकबजच्या अहवालानुसार, पाकिस्तान टीम मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दिसल्यानंतर बांगलादेशने रिव्ह्यू घेतला. त्यांना वाटते की 15 सेकंदांपेक्षा जास्त वेळ झाल्यानंतरही बांगलादेशला रिव्ह्यू घेण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकरणी अधिकृत तक्रार नोंदवण्यासाठी सामन्यानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी मॅच रेफरी नीयामुर राशिद यांची भेट घेतली.

मात्र या तक्रारीतून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नेमके काय अपेक्षित आहे, हे स्पष्ट झालेले नाही. असेही सांगितले जात आहे की मॅच रेफरींनी हेसन यांना समजावून सांगितले की या निर्णयामुळे यजमान संघाला कोणताही अनुचित फायदा मिळालेला नाही.

नेमकं काय घडलं होतं?

हा प्रकार पाकिस्तानच्या डावाच्या शेवटच्या षटकात घडला. पाकिस्तानला विजयासाठी दोन चेंडूमध्ये 12 धावांची गरज होती आणि स्ट्राइकवर कर्णधार शाहीन आफ्रिदी होता. बांगलादेशचा गोलंदाज रिशाद हुसेनने लेग साइडला चेंडू टाकला, ज्याला अंपायरांनी वाइड दिला.

यानंतर बांगलादेशने थेट वाइडसाठी रिव्ह्यू न घेता एल्बीडब्ल्यूसाठी अपील करत डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये दिसले की चेंडू शाहीनच्या बॅटला लागून गेला होता. त्यामुळे पंचाना आपला निर्णय बदलावा लागला. जरी बांगलादेशने आपला रिव्ह्यू गमावला, तरी त्या निर्णयामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मोठ्या स्क्रीनवर कोणताही टाइमर दिसत नव्हता.

हे ही वाचा –

Sanju Samson hug KL Rahul : सगळे अवॉर्ड घेण्यासाठी निघाले, अचानक पुढे गेलेला संजू KL राहुलला बघताच माघारी फिरला, सगळ्यांची मनं जिंकली, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.