बाबर आझमचे बुरे दिन सुरुच, नेट बॉलरनं केला करेक्ट कार्यक्रम, पाकिस्तानी खेळाडू पाहातच राहिला..
नवी दिल्ली : पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका आहे. त्यानंतर तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका पार पडणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील टी 20 मालिका सुरु असताना बाबर आझम पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. एका सराव सत्रात बाबर आझम नेट बॉलर विरुद्ध बाद झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बाबर आझम सराव सत्रात ऑफ स्पिन गोलंदाजाविरुद्द लेग साईडला शॉट खेळताना बाद झाला. पंचांनी त्याला एलबीडब्ल्यू बाद दिलं. बाबर आझम देखील पंचांच्या या निर्णयानं आश्चर्यचकित झाला. बाबर बाद होण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बाबर आझम यानं गेल्या काही महिन्यांमध्ये कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी 20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. 2025 मध्ये त्यानं 6 वनडे मॅचमध्ये 149 धावा केल्या आहेत. त्यामध्ये केवळ एक अर्थशतक आहे. दुसरीकडे 6 कसोटी डावांमध्ये फलंदाजी केली आहे. त्यात बाबरनं 184 धावा केल्या आहेत. याची सरासरी 30.67 इतकी आहे.
बाबर आझमला 2026 मध्ये टी 20 चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवत नवा संघ न्यूझीलंडला पाठवला आहे. तिथं सध्या टी 20 मालिका सुरु आहे. पाकिस्तानचं नेतृत्व सलमान आगाकडे देण्यात आलं आहे. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टी 20 मालिकेत पाकिस्तान 1-2 नं पिछाडीवर आहे. पहिल्या दोन मॅचेसमध्ये पाकनं विजय मिळवला तर तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या हसन नवाज याच्या शतकामुळं न्यूझीलंडचा पराभव झला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 29 मार्चला होईल तर दुसरा सामना 3 एप्रिल तर तिसरा एप्रिलला होईल.
निव्वळ गोलंदाजाने बाबर आझमला बाद केले. pic.twitter.com/apgu99iafs
– एम (@अक्रॅटीपॅटिस्टो) 21 मार्च, 2025
पाकिस्तानची खराब कामगिरी सुरुच
पाकिस्ताननं नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत पाकिस्तानला आयोजक असून देखील चांगली कामगिरी करता आली नाही. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानला या चॅम्पियन्स ट्रॉफीत एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. प्राथमिक फेरी म्हणजेच ग्रुप स्टेजलाच पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईत पार पडला. भारतानं पाकिस्तानला पराभूत केलंच त्याशिवाय अंतिम फेरीच्या लढतीत न्यूझीलंडचा पराभव करुन विजेतेपद मिळवलं.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.