पाकिस्तानी अभिनेत्री शमीन खानच्या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ, नेमकं काय म्हणाली जाणून घ्या…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानी अभिनेत्री शमीन खानच्या एका वक्तव्यामुळे तिच्याच देशात खळबळ उडाली आहे. तिच्या मते, पुरुष आपल्या पत्नीची परवानगी घेऊन दुसरं लग्न करू शकतो. या वक्तव्यानंतर शमीन आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेली आहे. एका पॉडकास्टमध्ये शमीनला पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल तिचे मत विचारण्यात आले. तिच्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. शमीन म्हणाली, “पहिल्या पत्नीला सोडू नये कारण ती वंश पुढे नेते. त्यामुळे, पहिल्या पत्नीला सोडणे चुकीचे आहे.”

मुलाखतकाराने तिला विचारले, पहिली पत्नी असताना पुरुषांनी पुनर्विवाह करावा का. शमीनने उत्तर दिले, “एखादी स्त्री ४० वर्षांपेक्षा जास्त वयाची असेल आणि पती पत्नीसोबत आनंदी नसेल, आणि त्याला वाटत असेल की त्याने दुसरं लग्न करावं, तर त्यात काहीही चुकीचे नाही. पुरुष आपल्या पत्नीची परवानगी घेऊन दुसरं लग्न करू शकतात. पण मी लग्नानंतरच्या विवाहबाह्य संबंधांच्या बाजूने नाही.”

शमीन खानची पॉडकास्टमधील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार चाहते तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. एका युझरने लिहिले, “लग्न ही आनंद घेण्याची गोष्ट नाही. ती एक जबाबदारी आहे.” दुसऱ्याने विचारले, “एखाद्या स्त्रीला एखादा पुरुष आवडत नसेल तर तिने काय करावे?” आणखी एका युझरने म्हटले, “हे बोलल्याबद्दल शामीनला तुरुंगात टाकले पाहिजे.”

३० वर्षीय शमीन खान ही एक पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री आहे. तिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने २०१९ मध्ये ‘गम’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Comments are closed.