जम्मू सीमेजवळ पाकिस्तानी नागरिकाला अटक

वृत्तपत्र/ श्रीनगर

जम्मू काश्मीर पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मू जिह्यातील सीमावर्ती भागात एका 20 वर्षीय पाकिस्तानी नागरिकाला अटक केली. हा तरुण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लेयाह जिह्याचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून त्याचे दहशतवादी संघटनांशी साटेलोटे आहे की नाही याची शहानिशा केली जात आहे. सखोल चौकशीअंतीच त्याची मुक्तता केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Comments are closed.