पलाश लग्नाच्या आदल्या रात्री बेडरुममध्ये दुसऱ्या मुलीसोबत सापडला, टीम इंडियाच्या सगळ्या मुलींनी

पलाश मुच्छाळ यांनी स्मृती मानधना यांची फसवणूक केली. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा नोव्हेंबर 2025 मध्ये पार पडणार होता. मात्र लग्न मोडल्यानंतर अचानक मोठी खळबळ उडाली. डिसेंबरमध्ये दोघांनीही सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत लग्न रद्द झाल्याची घोषणा केली होती आणि खासगी आयुष्याबाबत गोपनीयतेची विनंती केली होती. आता या प्रकरणाला नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. स्मृतीचा जवळचा मित्र असलेल्या विज्ञान माने यांनी पलाश मुच्छल यांच्यावर गंभीर आरोप करत लग्न तुटण्यामागील कथित कारण समोर आणले आहे.

काय आहे विज्ञान माने यांचा दावा?

विज्ञान माने यांच्या म्हणण्यानुसार, ते स्वतः लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी पलाश मुच्छल यांना एका महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडण्यात आले, असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. या घटनेनंतर वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले आणि कथितरित्या भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी पलाशला मारले, असा आरोप करण्यात आला आहे.

‘तो प्रसंग अतिशय भयानक होता. संपूर्ण कुटुंबच संतापले होते. मी विचार केला होता की लग्नानंतर ते सांगलीत स्थायिक होतील, पण सगळं उलटच घडलं,’ असे विद्यान माने यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले.

40 लाखांच्या फसवणुकीचा आरोप

विज्ञान माने यांनी पलाश मुच्छल यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोपही केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, पलाशने एका चित्रपट प्रकल्पाच्या नावाखाली त्यांच्याकडून सुमारे 40 लाख रुपये गुंतवणूक करून घेतली, मात्र ना चित्रपट तयार झाला, ना पैसे परत मिळाले. माने म्हणाले की, स्मृतीच्या कुटुंबामुळेच त्यांची पलाशशी ओळख झाली होती. पलाशने सहा महिन्यांत चित्रपट पूर्ण होईल, असे सांगितले होते. मात्र लग्न रद्द झाल्यानंतर पलाशने त्यांचे फोन उचलणेही बंद केले.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल याचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रशहरातील सांगली येथे होणार होते. मात्र स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराच्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर पलाशही तणाव आणि थकव्यामुळे आजारी पडला, त्यामुळे विवाह अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. पण काही दिवसांनंतर स्मृती मानधनाने अधिकृतपणे लग्न रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र आता समोर आलेल्या या आरोपांमुळे संपूर्ण प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून, हे खुलासे सर्वांनाच हादरवून टाकणारे आहेत.

हे ही वाचा –

Ind vs Nz 2nd T20 : 1 चेंडूत 11 धावा! भारत अन् न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडलं?, सगळ्यांच्या भुवया उंचावल्या

आणखी वाचा

Comments are closed.