इकडे Smriti Mandhana चं लग्न पुढे ढकललं, तिकडे ट्रेंडमध्ये आली Birva Shah; पलाशचा भूतकाळ समोर


पलाश मुच्छाळचे माजी फोटो व्हायरल : सुप्रसिद्ध म्युझिक कंपोझर पलाश मु्च्छल (Palash Muchhal) आणि टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 23 नोव्हेंबर 2025 रोजी दोघांच्या लग्नाचा मुहूर्त ठरलेला. 20 नोव्हेंबरपासूनच दोघांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना धुमधडाक्यात सुरुवात झालेली. पण, लग्नाच्या आदल्या रात्री अचानक काहीतरी घडलं आणि दोघांचं लग्न काही कारणास्तव रद्द करण्यात आलं. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे लग्नसोहळा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण, त्यानंतर स्मृतीनं लग्नसोहळ्याचे पलाशसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन डिलिट केल्यामुळे वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या. त्यात भरीस भर म्हणून पलाश मुच्छल स्मृती मानधनाला फसवत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. तसेच, सोशल मीडियावर पलाशचे काही फ्लर्टी चॅट्स व्हायरल झाले. अद्याप दोन्ही कुटुंबीयांकडून या प्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

लग्न रद्द केल्यानंतर, पलाशचे फ्लर्टी चॅट व्हायरल

पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचं लग्न पुढे ढकलण्यात आल्याच्या चर्चांदरम्यान, आता एकामागून एक चर्चांना उधाण आलं आहे. सुरुवातीला, रेडिटवर शेअर केलेल्या एका पोस्टनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. या कथित चॅटमध्ये पलाश मुच्छल एका चॅटमध्ये एका महिलेशी फ्लर्ट करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता पलाश मुच्छल जोरदार ट्रोल होत आहेत. तसेच, सोशल मीडियावर पलाश आणि स्मृती यांच्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. तसेच, दोघांचा लग्नसोहळा (Palash Muchhal Smriti Mandhana Wedding) रद्द करण्यात आल्यामुळे वेगवेगळी कारणं सांगून दावा केला जात आहे. याव्यतिरिक्त पलाशच्या स्मृती मानधनासोबतच्या रिलेशनशिपआधी ज्या तरुणींसोबत रिलेशन होतं, त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

पलाश मुच्छालचा, पोलास मुच्छाल लेवे अफीर अधिकारी

स्मतीला फसवल्याच्या अफवांसोबतच, पलाश मुच्छलचं जुनं प्रेम प्रकरण सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. संगीतकार काही वर्षांपूर्वी बिरवा शाहला डेट करत असल्याचं सांगितलं जातंय आणि पलाशचा बिरवाला प्रपोज करतानाचा एक फोटोही व्हायरल होतोय. ज्या पद्धतीनं पलाश मुच्छलनं स्मृतीला गुडघ्यावर बसून डीव्हाय पाटील स्टेडियममध्ये प्रपोज केलेलं, त्याचप्रमाणे त्यानं काही वर्षांपूर्वी बिरवा शाहला गुडघ्यावर बसून प्रपोज केलेलं. याचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल फोटोत पलाश प्रपोज करत असलेली Birva Shah कोण?

पलाश मुच्छल आणि स्मृति मानधना यांचं लग्न रद्द झाल्यानंतर बिरवा शाह हिचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. अशातच अनेकांना प्रश्न पडलाय की, ही बिरवा शाह कोण आहे? तिला पलाशनं लग्नासाठी प्रपोज केलेलं तर, मग त्यांनं तिला का सोडलं? व्हायरल होणारा फोटो खरा ती खोटा? दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसा, बिरवा शाह मुंबईतील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. 2017 मध्ये ती पहिल्यांदा लाईमलाईटमध्ये आली, ज्यावेळी पलाशनं तिला फिल्मी अंदाजात प्रपोज केलेला.

पलाश आणि बिरवाचा ‘तो’ फोटो व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका ट्वीटमध्ये पलाश मुच्छलच्या आसपास गुलाबी फुगे विखुरलेले दिसतायत. गुलाबाच्या पाकळ्यांनी एक मोठ्ठा हार्ट तयार करण्यात आला आहे. सगळीकडे मेणबत्त्यांचा मंद प्रकाश आहे. त्या गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या हार्टमध्ये पलाश गुडघ्यावर बसून एका मुलीला प्रपोज करतोय. त्या फोटोतली मुलगी बिरवा शाह असल्याचं सांगितलं जातंय.

पलाश आणि बिरवाची पहिली भेट कशी झाली?

पलाश आणि बिरवाची पहिली भेट मुंबईतील कॉमन फ्रेंड्समुळे झालेली. त्यावेळी बिरवा जय हिंद कॉलेजमध्ये शिकत होती, तर पलाश ‘तू ही है आशिकी’सारख्या हिट गाण्याला संगीत देऊन इंडस्ट्रीत नाव कमावत होता. त्यानंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि त्याच मैत्रीचं रुपांतर काही दिवसांनी प्रेमात झालं. काही दिवसांनी पलाशनं बिरवाला खास सरप्राइज देत, लग्नासाठी मागणी घातली. दोघांमध्ये सारंकाही ठीक सुरू होतं, पण अचानक दोघांच्या नात्याला ग्रहण लागलं आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

अचानक का ट्रेंड होऊ लागली Birva Shah?

पलाश आणि बिरवाच्या नात्याबाबत दोघांच्या कुटुंबीयांनाही माहीत होतं. पण, कित्येक वर्षांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झालेला. आता स्मृती आणि पलाशच्या नात्यात कथितरित्या तणाव वाढल्यानंतर सोशल मीडियावर अचानक बिरवा शाह ट्रेंड करू लागली. तसेच, पलाशचा बिरवाला ट्रोल करतानाचा फोटोही व्हायरल झाला.

नेटिजन्सकडून पलाशच्या भूतकाळाची झाडाझडती

स्मतीसोबतचं लग्न रद्द झाल्याची वेगवेगळी कारणं समोर येत असताना, नेटकऱ्यांकडून पलाशनं स्मृतीला फसवल्याचा दावा केला जात आहे. अशातच नेटकऱ्यांकडून आता पलाशच्या भूतकाळाची झाडाझडती घेतली जात आहे. तसेच, त्याच्याबाबत अनेक दावे केले जात आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Smriti Mandhana Palash Muchhal: स्मृती मानधना त्याच्यासाठी पहिली नव्हती किंवा शेवटचीही नव्हती, प्लेबॉय इमेज असलेल्या पलाश मुच्छल आतापर्यंत किती मुलींवर भाळला, कोणाकोणाला केलंय डेट?

आणखी वाचा

Comments are closed.