मोठी बातमी : स्मृती मानधनाचा होणारा नवरा मुंबईला रवाना, टीम इंडियाही परतली, पलाश मुच्छलचे कुटुं
स्मृती मानधना यांनी लग्न पुढे ढकलले भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा विवाहसोहळा 23 नोव्हेंबर रोजी पलाश मुच्छलसोबत पार पडणार होता. तीन दिवसांपासून तयारी जोरात सुरू होती, मंडप सजला होता, पाहुण्यांचे आगमन सुरू झाले होते. पण लग्नाच्या दिवशी धक्कादायक घटनेने सगळं वातावरण बदलून गेलं.
स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही घटना कुटुंबीयांसाठी मोठा धक्का ठरली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून सतत लक्ष ठेवण्यात येत असून कुटुंबीयांनी लग्न पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घेतला.
स्मृती मानधनाचा होणारा नवरा मुंबईला रवाना
लग्न पुढे ढकलल्यानंतर मुच्छल कुटुंबियांची हालचाल वाढलेली दिसून आली आहे. पलाश मुच्छल सांगलीतून काल उशिरा रात्री मुंबईला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याची बहीण, प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल आणि कुटुंबीयही सांगलीतून निघाले आहेत. लग्नासाठी तीन दिवसांपासून सांगलीत मुक्काम ठोकून असलेली भारतीय महिला क्रिकेट टीमही आज सकाळी विशेष वाहनाने मुंबईकडे रवाना झाली. स्मृती मानधनाच्या या अचानक घडलेल्या कौटुंबिक संकटामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व आणि चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे. सर्व जण श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करत आहेत.
स्मृतीने सोशल मीडियावरून हटवले लग्न-संबंधित पोस्ट
स्मृतीने इंस्टाग्रामवरून तिच्या लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकले आहेत. हा निर्णय पाहून तिचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. स्मृतीने ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील समझो हो ही गया या गाण्यावर आधारित एक मजेशीर रील पोस्ट करत लग्नाची माहिती दिली होती. या व्हिडिओमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डीही तिच्यासोबत दिसत होत्या. मात्र आता हा व्हिडिओ तिच्या अकाउंटवर दिसत नाही, तिने डिलीट केला की हाइड, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पलाश मुच्छलचा रोमँटिक प्रपोज
दुसरीकडे, पलाश मुच्छल यांनी स्मृतीला नवी मुंबईतील DY पाटिल स्टेडियममध्ये खास पद्धतीने प्रपोज केले होते. त्यांनी 21 नोव्हेंबरला या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, जो अजूनही त्यांच्या अकाउंटवर दिसत आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.