इंस्टाग्रामवरुन मैत्री, तरुणीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार; बीडच्या आरोपीला पुण्यातून अटक

पालघर : सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत, तसेच अनेकदा त्याचे तोटेही समोर आले आहेत. सोशल मीडियातून गुन्हेगारी देखील वाढल्याचं दिसून आलं, त्यातून पोलिसांच्य सायबर सेलकडे जबाबदारीचे काम सोपविण्यात आले आहेत. सोशल मीडियातून ओळख, नंतर प्रेम, लग्न आणि गंभीर गुन्ह्यासारख्या घटना यापूर्वी देखील अनेकदा घडल्या आहेत. आता, पालघर जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवरुन (Instagram) मैत्री करून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला जात आहे.

पालघरमधील इंस्टाग्राम प्रेम हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आला आहे. याप्रकरणात पीडित तरुणीने पालघरच्या केळवे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर, मूळचा बीड येथील असलेल्या आरोपीला पोलिसांकडून पुण्यातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ओळख करताना आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढताना आरोपी तरुणाने आपली ओळख खोटी दिल्याची फिर्याद या महिलेने दिली आहे. पीडित तरुणी ही हिंदू आदिवासी समाजातील असून आरोपी हा मुस्लिम समाजाचा असल्याने हा सर्व लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.

याप्रकरणी, पीडित तरुणीने केळवे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर, भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 69 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून केळवे पोलिसांकडून सध्या पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने लव्ह जिहादसारखे गंभीर आरोप केले आहेत. तर पीडीतेकडून माझ्यासोबत जो प्रसंग घडला, तो इतरांबरोबर घडू नये. त्यामुळे, सोशल मीडियापासून सावध राहावं असं आवाहन पीडितेने केलं आहे. तसेच, बजरंग दलाकडून मला मदत झाली म्हणून मी निभावली असेही एक व्हिडिओ प्रसारण करत तिने सांगितलं. दरम्यान आरोपीचं यापूर्वी लग्न झालेलं असून त्याने पीडीतेला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत अशी माहिती डी.वाय.एस.पी विकास नाईक यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय; आशाताईंना राज्य सरकारची अनोखी आदरांजली

आणखी वाचा

Comments are closed.