पालघरच्या तारापुर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात वायु गळती; चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
पालगर न्यूज: पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील औषध निर्माण कारखान्यात वायु गळती झाल्याची अपघात घडली आहे? या घटनेत विषारी वायूची बाधा होऊन चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालावाय. तर दोन कामगारांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलीवाय. या दुर्घटने प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे? तर वायुगळतीच्या घटनेची औद्योगिक व आरोग्य संचालनालय यांच्यामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसारतारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एफ-13 वरील मेडली फार्मास्युटिकल्स लिमिटेड या औषध निर्माण कारखान्यात गुरुवारी दुपारी साडे तीन ते चार वाजेच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अचानक वायू गळतीची घटना घडली. या दुर्घटनेत सहा कामगारांना विषारी वायूची बाधा झाल्याने बोईसरमधील शिंदे हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले. मात्र सहा कामगारांपैकी सहाय्यक व्यवस्थापक कल्पेश राऊत (38), बंगाली ठाकूर (38), धनंजय प्रजापती (30), कमलेश यादव (30) यांना रुग्णाला दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्निल शिंदे यांनी दिली. तर उत्पादन व्यवस्थापक रोहन शिंदे (35 वर्ष) आणि निलेश हाडळ (32 वर्ष) यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कारखान्यात एकूण 150 कामगार संख्या, चार कामगारांचा मृत्यू
मेडली फार्मास्युटिकल्स कारखान्यात एकूण 150 कामगार संख्या असून वायुगळती होऊन त्यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताएफ आणि रुग्णालय परिसरात मृत कामगारांच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून कारखाना व्यवस्थापना विरोधात संताप व्यक्त केला. कमलेश यादव या मृत कामगाराच्या भावाने कारखान्यामध्ये सुरक्षाविषयक उपकरणांचा अभाव असल्याचे सांगितले. तसेच वायूबाधा झालेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी एक ते दीड तासांचा उशीर झाल्याचा आरोप केला. आमदार राजेंद्र गावित, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी कारखाना आणि रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
दुर्घटनेप्रकरणी कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा दाखल
दरम्यानशुक्रवारी सकाळी तारापूर ग्रामीण रुग्णालयात चार ही मृत कामगारांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी कारखाना व्यवस्थापन मधील संचालक सोहेल खाती, मुख्य आर्थिक अधिकारी देवेंद्र भगत, प्रकल्प प्रमुख धर्मश पटेल,देखभाल अभियंता शुभम ठाकुर यांच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 364/2025 भारतीय न्याय संहिता कलम 105, 286, 289, 125 (अ), 125 (ब), 3 (5) प्रमाणे, भा.द.वि.स कलम 304(2), 337, 338.284, 287 प्रमाणे नोंद करण्यात आला असून याप्रकरणी औद्योगिक व आरोग्य संचालनाचे अधिकारी, पोघेतलेएस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागांकडून अधिक चौकशी सुरू आहे.
कारखाना व्यवस्थापनाचे सुरक्षित उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
मेडली फार्मासिटिकल लिमिटेड या कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न करता मानवी जिवितास धोकादायक असणारे विषारी वायु व घातक रसायनांचा वापर करून उत्पादन प्रक्रिया चालु ठेवण्यात आली. कंपनी व्यवस्थापनाने कंपनीतील 101 क्रमांकाच्या रिॲक्टरचे बॉटम वॉल लिकेज असल्याची आधिच माहिती असताना देखील त्याची दुरुस्ती न करता, न कंपनीतील यंत्र सामुग्रीकडे दुर्लक्ष करून कंपनीचे कामगार हे काम करीत असताना त्यांचे जिवितास धोका आहे, याची जाणीव असताना देखील काम करण्यासाठी सागण्यात आले. तसेच कामागारांच्या सुरक्षितेसाठी व त्यांचे जिवितेच्या देखरेखीकरीता सुरक्षा अधिकारी न नेमता, कामगारांना कोणत्याही प्रकारचे जिवितेच्या सुरौक्षते विषयक प्रशिक्षण न देता उत्पादन प्रक्रिया तशीच चालु ठेवल्याने अलबेन्डाझोल उत्पादनाची प्रक्रिया चालु असताना रियाक्टरच्या व्हेंटमधून विषारी वायूची गळती होऊन अपघात घडल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.