ट्रेंड – सर्कशीतला वाघ थेट प्रेक्षकांमध्ये पोहोचला…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रशियामध्ये सर्कस सुरू असताना काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. रिंगमध्ये तीन वाघ आणि दोन ट्रेनर आपले कसब दाखवत होते. प्रेक्षक टाळ्या वाजवून वाघांच्या खेळाचा आनंद घेत होते. मात्र अचानक रिंगचा एक भाग तुटून खाली पडला आणि एकच गोंधळ उडाला. रिंग तुटल्याच्या आवाजाने आणि गोंधळाने रिंगमधील तिन्ही वाघ प्रचंड घाबरले. ते सैरावैरा धावू लागले. याच धावपळीत एका वाघाने थेट प्रेक्षकांच्या गॅलरीच्या दिशेने झेप घेतली. आपल्या अगदी समोर वाघाला पाहून प्रेक्षकांची पाचावर धारण बसली. लोक पळू लागले. सुदैवाने वाघाने कोणावरही हल्ला केला नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Comments are closed.