समाजातील दरी मिटवूयात; पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात पुढे केला? नेमकं काय म्हणाल


मनोज जरांगे यांच्यावर पंकजा मुंडे : मी जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला. मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे (Gopinath Munde) व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे, असे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. परळी (Parli) येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमातून त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, आजचा कार्यक्रम अराजकीय नाही. मी कामापुरतं नातं जोडत नाही. ज्यांच्या बरोबर आपला विरोध होता ते आपल्या सोबत आहेत. माझे बाद मत मोजले असते तरी मी निवडून आले असते, असे भाष्य त्यांनी  लोकसभा निवडणुकीच्या पराजयावर केले. गोपीनाथ मुंडे विजयानंतर माझी पोरगी सर्वांवर भारी पडली, असे म्हणाले होते. त्यांनी मला थँक्यू म्हटले होते, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Pankaja Munde: लोकसभा निवडणुकीवर भाष्य

ज्यांनी माझं वाईट चिंतलं नाही, असे सर्वजण व्यासपीठावर आहेत. लोकसभा निवडणुकीत मला मराठा आरक्षणावर प्रश्न विचारले गेले. त्यावेळी मी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यावर ठाम होते. मला कोणाचाही राग नाही. पंकजा ताई हरल्यावर काहींनी आत्महत्या केल्या. त्यानंतर मी हरले. त्यावेळी मी ठरवलं आता मारायचं पण हरायचं नाही. लोकसभेला बीड थोडक्यात हरले. पण मी एकमेव विधान परिषदेची आमदार जी मंत्री मंडळात आहे. मी कोणालाही विधानसभा निवडणुकीत उभं केलं नाही. माजी मंत्री बदामराव पंडित आणि गेवराईचे स्थानिक नेते बाळराजे पवार हे आता आपल्या सोबत आहेत. युतीबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतील, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde on Manoj Jarange: आपल्या समाजामधील दरी मिटवूयात

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, आता नवीन उमेदीने काम करा. मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील  माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला. प्रत्येकाला sc st व्हायचे आहे. जरांगे पाटील यांनी जरी उपोषण केले तरी मी पालकमंत्री म्हणून भेट द्यायला तयार आहे. SC,ST चे आरक्षण केंद्र सरकार देते. मी कधीही निझामाचे गॅझेट असे बोलले नाही. मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे. मी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही. माझ्या जातीचा असला तरी चुकीच्या भूमिकेला पाठिंबा नाही.

Pankaja Munde:  मी तुमच्या सुखात नाही तर दुःखात सोबत

मी दररोज 400 लोकांना भेटते. मी तुमच्या सुखात नाही तर दुःखात सोबत आहे. संघर्षात सोबत आहे. दारू बनवत असलो तरी आम्ही पाजत नाही. निवडणुकीत वज्रमूठ करा. अजित पवार यांच्याबरोबर युतीची चर्चा झाली आहे. काही ठिकाणी युती होईल. काही ठिकाणी होणार नाही. जास्त डोक लावू नका फक्त काम करा. इतर ठिकाणच्या उमेदवारासाठी माझ्याकडे येऊ नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Pankaja Munde on vaidyanath Sakhar Karkhana: मी कसा कारखाना विकेल?

लोकांचे कारखाने गंजून गेले आहेत. मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे. मी कसा कारखाना विकेल? माझ्या कारखान्याला पैसे मिळाले नाहीत. सगळ्यांच्या कारखान्याला पैसे मिळाले. मी माझ्या बापाचं चौथ अपत्य जगवलं आहे. यावेळी वैद्यनाथ कारखान्यात 10 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे, असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

आणखी वाचा

फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करा, मंत्री पंकजा मुंडेंची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार

आणखी वाचा

Comments are closed.