अनंत गर्जेचा भाऊ अन् वडील इथे हसतायत, तीने स्वतःला संपवलं मग हे का पळाले? गौरी पालवेंच्या मामाच
पंकजा मुंडे पीए प्रकरण: राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे (anant garje) यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे (Gauri Palve) यांचा 7 फेब्रुवारीला विवाह झाला होता. वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन गौरी पालवे यांनी आत्महत्या केली आहे. काल (दि. 22) सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र आता गौरी पालवे यांच्या मामांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना अनंत गर्जेंच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केलेत.
गौरी पालवे यांचे मामा शिवदास गर्जे म्हणाले की, पंकजाताई यांना हा माणूस माहीत नव्हता की, हा किती नालायकपणा करत आहे. ताईंचा यात काहीही विषय नाही. पण, अनंत गर्जेने मुलीच्या वडिलांना फोन केला अन् लगेच कट केला. त्यानंतर तिच्या आईला फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. तिची डेड बॉडी माझ्यासमोर आहे. दोन-तीन महिन्यांपासून गौरीचे आणि त्याचे वाद सुरू होते. गौरीला त्याचे अफेअरचे काही प्रकरणादेखील माहिती झाले होते. तरीही तिने त्याला माफ केले होते. पण, तिने त्याला पुन्हा चॅटिंग करताना पाहिले. त्यामुळे त्यांचे वाद होत होते. तो तिला खूप टॉर्चर करत होता, असा आरोप त्यांनी केलाय.
Pankaja Munde PA Case: तीने आत्महत्या केली मग हे पळाले का?
शिवदास गर्जे पुढे म्हणाले की, तो म्हणतो की गळफास घेतला, गळफास घेत होती मग थांबवलं नाही? तो फरार आहे. त्याचे भाऊ आणि वडील इथे बाहेर हसत आहेत. त्यांचे कुणीही इथे नाही. तुम्ही जर काहीच केले नाही तर कणखरपणे थांबायचे, पण कुणीही थांबलं नाही. जर तीने आत्महत्या केली मग हे पळाले का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
Pankaja Munde PA Case: इन कॅमेरा पोस्टमार्टम करावे
दरम्यान, गौरी पालवेंचे मामा हृषिकेश गर्जे म्हणाले की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. एका कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय द्यावा. गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करतो की, या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी आणि इन कॅमेरा पोस्टमार्टम करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.