गौरी गर्जे मृत्यूप्रकरणात दमानियांचा पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, प्रकाश महाजन संतापले, म्हणाले,
अनंत गर्जे आणि गौरी गर्जे गुन्हा: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे पीए अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे (Gauri Palve) यांनी वरळीतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अन्य महिलेसोबतचे संबंध उघड झाल्याने अनंतसह त्याचे कुटुंबीय गौरीला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचे देखील तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. या प्रकरणात अनंत गर्जेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रविवारी रात्री अटक केली आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्याच्या आक्रमक झाल्या आहेत. अंजली दमानिया यांनी गौरीच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडेंनी पोलिसांना कारवाई करायला का सांगितलं नाही? असा सवाल उपस्थित करत पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. आता यावरून पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी अंजली दमानिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
Prakash Mahajan on Anjali Damania: नेमकं काय म्हणाले प्रकाश महाजन?
प्रकाश महाजन म्हणाले की, पंकजा मुंडे यांचं नाव आलं की, अंजली दमानिया बिळातून बाहेर आल्या. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात त्या कुठे होत्या? बीडच्या क्लासेसमध्ये जे प्रकरण झालं, त्यावेळेस त्या कुठे होत्या? आपल्याला पंकजा नावाचा कावीळ झाला आहे. पंकजाच्या द्वेषाने तुम्ही पछाडलेल्या आहात. पंकजाच्या विरोधात तुम्हाला प्रायोजित केले गेले आहे. उद्या पंकजाची थोडी जरी बातमी आली तर तुम्ही व्हेंटिलेटरवर जरी असाल तरी मास्क काढून तुम्ही पंकजाच्या विरोधात बोलाल, असा हल्लाबोल त्यांनी अंजली दमानिया यांच्यावर केलाय.
Anjali Damania on Pankaja Munde: काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या की, गौरी पालवेने तिने आत्महत्या केली वाटत नाही. अनंत गर्जे हा तिचा पती आहे. मला यात राजकारण आणायचं नाही. पण दुख होतंय की पंकजा मुंडे यांना याबाबत रात्री कळलं असेलच. त्यांनी रात्री पोलिसांना फोन करून चांगली कारवाई करा. माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई करा, असं म्हणणं अपेक्षित आहे. त्यांनी ते म्हणावं ही विनंती आहे, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.