परागच्या ड्रेसिंग रूममधील ‘वेपिंग’ने उडवली खळबळ; आधी चौकशी, नंतरच बीसीसीआयकडून कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना ड्रेसिंग रूममध्ये पराग वेपिंग (ई-सिगारेटचे धूम्रपान) करतानाचा व्हिडीओ समोर आला आणि क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली. सोळाव्या षटकादरम्यान घडलेल्या या प्रकारात यशस्वी जैसवाल, युद्धवीर सिंग चरक आणि कुलदीप सेन हे सहकारीही जवळ उपस्थित असल्याचे दिसून आले.

एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार बीसीसीआय आता या प्रकरणाची दखल घेत असून कोणतीही कारवाई करण्यापूर्वी परागकडून स्पष्टीकरण मागवण्याची शक्यता आहे. ‘वेपिंगला परवानगी नाही. त्यामुळे परागचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच आयपीएल पुढील निर्णय घेईल,’ असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्या ने स्पष्ट केले असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

नियमांच्या चौकटीत पाहिले तर आयपीएल सामन्यांदरम्यान मैदान परिसरात ठराविक जागा वगळता धूम्रपान आणि वेपिंग पूर्णपणे बंदी आहे. त्यातच हिंदुस्थानातील कायदे अधिक कडक आहेत. इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम -2019अंतर्गत ई-सिगारेटशी संबंधित उत्पादन, विक्री, खरेदी, आयात-निर्यात आणि जाहिरात यांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आणि सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणावर अद्याप बीसीसीआय, राजस्थान किंवा स्वतः पराग यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र या घटनेमुळे परागवरचा दबाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. आधीच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना परागची फलंदाजी डळमळीत झाली आहे.

Comments are closed.