रशियाच्या मदतीने बांगलादेशने अणुऊर्जा प्रकल्पात पहिले पाऊल टाकले; अणुऊर्जेवर वीज निर्मिती करणारा जगातील 33 वा देश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रशियाची मदत घेऊन बांगलादेशने अणुऊर्जा प्रकल्पात आपले पहिले पाऊल टाकले आहे. बांगलादेशने पाबना जिह्यातील पद्मा नदीच्या काठावर असलेल्या रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पात युरेनियम इंधन भरण्यास सुरुवात केली आहे. रशियाची मदत मिळाल्याने आता बांगलादेश हा हिंदुस्थान, पाकिस्तान यांसारख्या देशांच्या पंक्तीत बसला असून अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करणारा दक्षिण आशियातील तिसरा देश ठरला आहे.

पाबना जिह्यातील या प्रकल्पाचे पंत्राट रशियातील सरकारी कंपनी रोसाटॉम यांच्याकडे आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 12.65 अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. यातील 90 टक्के निधी हा रशियाने कर्ज म्हणून दिला आहे. या प्रकल्पामध्ये 1200 मेगावॅटच्या दोन अणुभट्टय़ा असून या प्रकल्पातून 2400 मेगावॅट वीज निर्मिती करणार आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये रशियाने बांगलादेशला या प्रकल्पासाठी युरेनियमची पहिली खेप दिली. अणुऊर्जेवर वीज निर्मिती करणारा बांगलादेश हा जगातील आता 33 वा देश ठरला आहे. अणुऊर्जा प्रकल्पाची प्रक्रिया आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टप्प्याटप्प्याने पार पाडली जात आहे. या प्रक्रियेचा पहिला भाग म्हणून कालपासून यातील युनिटमध्ये इंधन भरण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षी ऑगस्टपर्यंत हा प्रकल्प किमान 300 मेगावॅट वीज निर्मिती सुरू करण्याची शक्यता आहे.

अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या नियंत्रणाखाली

बांगलादेशचा हा अणुऊर्जा प्रकल्प पूर्णपणे रशियाच्या नियंत्रणाखाली आहे. या प्रकल्पाला ऊर्जा देण्यासाठी लागणारे युरेनियम रशियाकडून येणार आहे. त्यानंतर याचा वापर झाल्यानंतर उरलेला धोकादायक अणु कचरा पुन्हा रशियाकडे परत जाणार आहे. यामुळे बांगलादेश आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी अनेक दशके रशियावर अवलंबून राहणार आहे. बांगलादेशमधील अणुऊर्जा प्रकल्प अत्यंत खर्चिक आहे. या प्रकल्पासाठी येणारा एपूण खर्च 12.65 अब्ज डॉलर्स इतका आहे.

Comments are closed.