दुचाकीसाठी पूजाकडे माहेरून 50  हजाराचा तगादा , नवरा – नणंदेच्या  त्रासाला कंटाळून गळफास; महिनाभ

परभणी गुन्हा: हांडा द्यावूनाही,थाटामाटात लग्न लावून दिल्यानंतरही  सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणारी पैश्यांची मागणी आणि त्यातून केला जाणारा छळ असह्य झाल्याने वैष्णवीने आत्महत्या केली . त्यानंतर वैष्णवीचा छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबाला अटक झाली. मात्र, या वैष्णवी सारखाच परभणीतील पूजाला  न्याय मिळेल का ? असा प्रश्न तिच्या कुटुंबियांना पडलाय . कारण दुचाकी घेण्यासाठी 50 हजार पूजाच्या कुटुंबियांनी दिले नाहीत, त्यामुळे पूजाचा छळ करण्यात आला आणि त्यातूनच तिनेही आत्महत्या केली. आज या घटनेला 1 महिना उलटतोय. मात्र ,अद्यापही तिच्या नवऱ्याला आणि इतरांना अटक करण्यात आलेली नाही. महत्वाचे म्हणजे पूजाच्या आई वडिलांना पोलिसांनी कित्येक तास बसून घेतले, त्यानंतर गुन्हा दाखल केला.

नक्की प्रकरण काय?

परभणीच्या तुळजापूर गावामध्ये राहणारे आणि पेशाने ड्रायव्हर असलेले गणेश बोचरे यांना चार मुली आणि एक मुलगा यातील दोन नंबरची मुलगी पूजा हीचा विवाह परभणीच्या सेलू तालुक्यातील सेलवाडी येथील गजानन निर्वळ या तरुणाशी ३ डिसेंबर २०२४ ला झाला होता .  गणेश विचारे ड्रायव्हर असल्याने त्यांनी परिस्थिती जेमतेमच ; मात्र तरीही कर्ज काढून मुलीचे लग्न निर्वळ कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मोठ्या थाटात केले . अनेक वस्तूही मुलीच्या सुखी संसारासाठी दिल्या ?होत्या .  निर्वळ हा पुण्यातील चाकण येथे खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याने लग्न झाल्यावर पूजाही पुण्यात गेली . तिथं गजाननचे आई वडील नणंद तिची 2 मुले ही एकत्रच स्पाईन सिटी खराबवाडी महाळुंगे येथे राहत होते.

लग्नानंतर  3 महिन्यात पैशांसाठी तगादा

लग्न झाल्यानंतर तीन महिने चांगलं नांदवलं . मात्र , तीन महिन्यानंतर पूजाचा पती गजानन याने ‘मला दुचाकी घ्यायची आहे , त्यामुळे तुझ्या आई-वडिलांकडून 50,000 रुपये घेऊन ये .. ‘असा तगादा लावला . पूजानेही तिच्या आई-वडिलांना या संदर्भात सांगितले व 50,000 रुपये देण्याची मागणी केली .मात्र, लग्नाच्या अगोदरच झालेले कर्ज असल्याने पन्नास हजार रुपये आपण देऊ शकत नसल्याचा तिच्या आई-वडिलांनी सांगितलं .  यावरूनच पूजा चा नवरा गजानन व तिच्या नणंदेकडून  पूजाचा छळ सुरू झाला .

पूजाच्या कुटुंबियांनी नोंदवली  तक्रार

27 एप्रिल रोजी दुपारी पूजाच्या सासऱ्याने यांना फोन करून सांगितले की पूजाने आत्महत्या केली आहे . मग पूजाचे वडील गणेश तसेच आई रेखा मुली व गावातील काहीजण घेऊन हे सर्व कुटुंब पुण्यात पोहचलं .  त्या ठिकाणी गेल्यानंतर काय झालं हे विचारलं  असता गजानन यांनी काहीही त्यांना सांगितले नाही . यानंतर पूजाचा अंत्यविधी उरकला. एक मे रोजी पूजाच्या आई-वडिलांनी पुण्यातील महाळुंगे पोलीस स्टेशन गाठले आणि पूजाचा 50 हजारांसाठी तिच्या नवऱ्याकडून आणि ननदेकडून छळ करण्यात आला आणि त्यांनीच माझ्या पूजाचा खून केला, अशी तक्रार पोलीस स्टेशनला देण्यासाठी गेले. मात्र अनेक तास त्यांना बसून ठेवण्यात आलं.  त्यानंतर टाळाटाळ केल्यानंतरही पूजाच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्याचा तगादा लावला. त्यामुळे पोलिसांनी अनेक तास उशिराने पूजाचा नवरा आणि तिच्या नणंदे विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र अद्यापही या प्रकरणांमध्ये कुठल्याही प्रकारची अटक किंवा कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आम्हाला न्याय सरकारने द्यावा अशी मागणी पूजाच्या आईने केली आहे .

अधिक पाहा..

Comments are closed.