परभणी सुन्न! झाडाखाली मुलाशी गप्पा मारताना अचानक 6 जण आले, तरुणीसोबत अनर्थ घडला..नराधमांनी व्हि


परभणी क्राईम न्यूज : परभणीतील जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात 14 ऑक्टोबर रोजी एका गंभीर घटनेची नोंद झालीय. या घटनेने संपूर्ण परभणी जिल्हा सुन्न झालाय. झाडाखाली गप्पा मारत बसलेल्या तरुणीजवळ अचानक 6 जणआले. तिच्यासोबत असलेल्या तरुणाला पकडून ठेवलं त्यातील 3 जणांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला व या घटनेचा व्हिडिओ ही चित्रित केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत 6  नराधमांना अटक केली आहे.  (Parbhani Crime)

नेमका प्रकार काय?

घटनेच्या तपासानुसार, 14 ऑक्टोबर रोजी तरुणी आणि तिचा मित्र झाडाखाली बसून गप्पा मारत होते. यावेळी करण, शेषेराव, साबेर, मुन्या, अर्जुन आणि लखन हे 6  जण अचानक त्या ठिकाणी आले. अर्जुन आणि लखन यांनी तरुणाला पकडून ठेवले, तर करण, शेषेराव आणि साबेर यांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेचा व्हिडिओ काढला. घटना समजताच जिंतूर पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली. 14 ऑक्टोबर रोजी ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात घडली असून या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी सतर्कता बाळगत पीडित तरुणीला विश्वासात घेवून गुन्हा दाखल केला आणि 6  आरोपींना अटक केली आहे.. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी मंदिर संस्थात इटोली शिवारात हा संतापजनक प्रकार घडलाय.

या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहिता (IPC) 2023 कलम 376(1), 126(1), 310 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66(इ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी अर्जुन दत्तराव बटकुले, शेख साबेर शेख सत्तार, शेषराव दत्तराव शेवाळे यांच्यासह अन्य तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परभणीत मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तपास सुरू ठेवला असून, व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे सखोल अभ्यास केला जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.