मुलीची छेड काढल्याचा जाब विचारला अन्…; परभणीत मुलीसह कुटुंबियांना बेदम मारहाण, 16 जणांविरोधात

परभणी क्राईम न्यूज : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हमदापूर गावात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढल्यावरून तिच्या वडिलांनी आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित तरुणाने गावातील आपल्या साथीदारांसह मुलीच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुदर्शन शिंदे या तरुणाने विद्यार्थिनीचा हात धरून “माझ्यासोबत चल” असे म्हणत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने ही बाब घरी सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र, या जाब विचारण्यालाच आव्हान मानत सुदर्शन शिंदे गावातील सुमारे 15 जणांना एकत्र करून मुलीच्या घरात शिरला.

Parbhani Crime News: 16 जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

या टोळक्याने जातीवाचक शिवीगाळ करत काठी, दगड आणि हाताने बेदम मारहाण केली. हल्ल्यात मुलीसह तिच्या कुटुंबातील आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून सुदर्शन शिंदे याच्यासह एकूण 16 जणांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी ॲक्ट) तसेच इतर 21 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Perbahi Crime News News News: गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

या घटनेनंतर हमदापूर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून असून, वरिष्ठ पोलीस अधिकारीही गावात ठाण मांडून आहेत.

Jalgaon Crime News: नशिराबाद येथे निवडणुकीवरून वाद; दोन गटात हाणामारी, 17 जखमी

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे नगरपरिषदेच्या निवडणुकीतील कामावरून वाद उफाळल्याने दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने 16 ते 17 जण जखमी झाले. दोन्ही गटांकडून दगड व विटांचा वापर करण्यात आला. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गावात शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. निवडणुकीत आमचे काम न करता इतरांचे का केले? या कारणावरून दोन गटात वाद झाला. अचानक उसळलेल्या हाणामारीने परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

आणखी वाचा

Goa double murder: आधी हेरायचा; मग मैत्री, प्रेम, नंतर शरीरसुख घेऊन…; 15 महिलांना संपवलं? रशियन आरोपीचे पोलीस तपासात चक्रवून टाकणारे दावे, घटनेनं गोवा हादरला!

आणखी वाचा

Comments are closed.