आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली- रोहित पवार
परभणी : जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील पिंपराळा (परभणी) गावात नागरिकांना अतिसार सदृश्य आजार झाल्यानंतर त्यांचेवर गावातील मंदिरासमोरच चटई अंथरुण उपाचर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ॲम्ब्युलन्स आणि सर्व टीम सोबत घेऊन गेलेले डॉक्टर रुग्णाच्या मर्जीखातर गावातच इलाज करत असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल माध्यमात पोस्ट करत या मतदारसंघाच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, हे जिल्हा परिषद सर्कल राष्ट्रवादीच्याच जिल्हा परिषद सदस्याचे असल्याचे सांगत भाजपकडूनही (BJP) राजकीय भूमिका मांडण्यात आलीय. त्यामुळे, दोन्ही बाजूने सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
जिंतूरमधील पिपराळा गावात 13 जून म्हणजेच शुक्रवारपासून महिला-पुरुषांना संडास, पोटदुखीचा त्रास सुरू आहे. त्यावर गावातील आशा वर्कर अंजना डाखोरे यांनी प्राथमिक उपचार म्हणून औषध गोळ्या दिल्या, त्याने फरक पडत नसल्याने चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. विवेकानंद खांडरे, आरोग्य सेवक आणि परिचारिका यांच्याकडून गावातील हनुमान मंदिरासमोर 20/25 महिलांना सलाईन लावून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, हे उपचार मंदिरासमोरच खाली अंथरलेल्या चटईवर सुरु होते. याबाबत सोशल माध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर, रुग्णांना चारठाणा येथील आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे.
मंदिरासमोर चटईवर उपचार करण्याबाबत या पथकाशी विचारणा केली असता रुग्णांच्या म्हणण्यांनुसारच आम्ही गावात हे उपचार केल्याचे त्यांनी सांगितले. गावात मागच्या 4 दिवसात 65 ते 70 रुग्णांना हा त्रास सुरु होता, यातील काही जण उपचारानंतर बरे झाले. दरम्यान गावातील विहिरीचे दूषित पाणी पिल्याने हा त्रास सुरु झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असून त्या पाण्याचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत. पिपराळा गावात चटईवर उपचार सुरु असल्याबाबत काही फोटो आमदार रोहित पवार यांनी सोशल माध्यमात टाकले असून परभणीच्या पालकमंत्री तथा राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदार संघातील हे गाव असल्याचे सांगत निशाणा साधला.
दरम्यान, दुसरीकडे भाजपच्या पदाधिकऱ्यानी देखील हे जिल्हा परिषद सर्कल राष्ट्रवादीच्या सदस्यांचे असल्याचा आरोप केला. याबाबत आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मात्र कुठलेही उत्तर अद्याप दिले नाही.
पाणीपुरवठा आणि आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मतदारसंघातील आणि त्यांच्या जिंतूर शहरापासून 5 km अंतरावर असलेलं संपूर्ण आदिवासी पिंप्राळा गाव अतिसाराने बेजार असून या रुग्णांवर गावात अंगणातच उपचार करण्यात येत आहेत. रुग्णांना लावण्यासाठी दोरीवर टांगलेले हे केवळ सलाईन… pic.twitter.com/8bON35hrvg
– रोहित पवार (@RRPSpeaks) 16 जून 2026
हेही वाचा
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Comments are closed.