धक्कादायक! गुरुकुलात शिकणाऱ्या बालकाला उलटे टांगून गरम वाळूचे चटके दिले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

परभणीतील पिंगळी रोडवरील बलसा पाटी येथे संगीत साधना गुरुकुल महाविद्यालयात निवासी शिक्षण घेणाऱ्या सातवर्षीय विद्यार्थ्याला उलटे टांगून गरम वाळूचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, आरोपी शिक्षकाविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिलोली तालुक्यातील बेंबळी येथील रघुनाथ पवार हा सातवर्षीय विद्यार्थी गुरुकुलात निवासी शिक्षण घेत आहे. त्याचे आई-वडील पुणे येथे मजुरी करतात. गेल्या तीन-चार दिवसांपासून रघुनाथचा आजीशी संपर्क होत नसल्याने आजीला संशय आला. त्यानंतर काही नातेवाईकांसह त्यांनी थेट गुरुकुल गाठले असता बालकाला बेदम मारहाण तसेच गरम वाळूने चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर आजीने बालकाला घेऊन शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे गाठले. तेथे ठाणे प्रमुख विश्व कासले यांनी फिर्याद नोंदवून घेऊन आरोपीविरुध्द बालसंगोपन तसेच संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

Comments are closed.