‘निळा टी-शर्ट घातलेल्याने माझ्याशी…’, ठाण्याच्या नामांकित शाळेत 4 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य, C
ठाणे: गेल्या काही महिन्यांपासून शाळांमध्ये अल्पवयीन मुलीसोबत होणाऱ्या गैरकृत्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. अशातच ठाणे शहरातील एका नामांकित शाळेमध्ये एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेतच गैरकृत्य झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने
तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचे पीडित मुलीने तिच्या आईला सांगितलं. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. 30 जुलै रोजी दुपारी शाळेच्या बाथरूममध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी पहिल्यांदा मुलुंड येथील नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये काय?
मात्र, ज्या शाळेत हे घडलं ती संबधित नामांकित शाळा ठाण्यात असल्यामुळे तेथील वर्तकनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची तपासणी केली. मात्र, चौकशीत काहीही आढळले नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं. शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये ही मुलगी व तिची मैत्रीण बाथरूममध्ये जाताना कॅमेऱ्यात दिसत आहे. मात्र, अन्य कुणीही त्यांच्यासोबत किंवा नंतर आतमध्ये गेल्याचे दिसत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, पालकांनी असा आरोप केला आहे की 30 जुलै रोजी सकाळी 11:15 ते दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान निळ्या कपड्यातील एका व्यक्तीने शाळेच्या आवारात त्यांच्या मुलीसोबत गैरकृत्य केले, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पोलिसांनी त्यांच्या चौकशीचा भाग म्हणून शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
“आम्ही या प्रकरणाची चौकशी POCSO (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) कायद्याअंतर्गत करत आहोत. सुरुवातीच्या सीसीटीव्ही तपासात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली नसली तरी, आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.या प्रकरणात शाळा प्रशासन पोलिसांना सहकार्य करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत आणि परिसरातील इतर साक्षीदारांकडूनही माहिती घेतली जात आहे.
देवनारमध्ये 37 वर्षीय कोचचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार
देवनारमध्ये क्रिकेट क्बलच्या 37 वर्षीय कोचनेच 13 वर्षीय मुलीसोबत लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आर पी क्रिकेट फाऊंडेशन, राजाराम बापु पाटील मनोरंजन मैदान, मानखुर्द लिंक रोड येथे ही घटना घडल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. मागील अनेक दिवसापासून क्रिकेट कोच राजेंद्र पवार याच्याकडून हा प्रकार सुरू होता. दररोजच्या मानसिक तणावाला कंटाळून अखेर अल्पवयीन मुलीने या घटनेची माहिती कुटुंबियाना दिल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी कलम 12,4,6,8, पोस्कोसह 351(2), 64(2) एफ, 64(2) आय, 64(2)एम, 65(1),8 भा न्या सं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी देवनार पोलिसांनी राजेंद्र पवार या क्रिकेट कोचला अटक केली आहे
आणखी वाचा
Comments are closed.