‘आधी २१ कोटी भरा, मगच व्यवहार रद्द’, पार्थ पवारांना जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी निबंधक कार


पुणे: पुण्यातील मुंढवा (Mundhwa) येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला एकवीस कोटींचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरावं लागेल’, अशी अट सहदुय्यम निबंधक कार्यालयाने घातली आहे. अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर अमेडिया कंपनीने (Amedia Company) नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केला होता. मात्र, आयटी पार्कच्या नावाखाली पूर्वी मिळवलेली मुद्रांक शुल्कातील सवलत आता लागू होणार नाही, असे सांगत निबंधक कार्यालयाने ही अट घातली. ३०० कोटी रुपयांच्या या व्यवहारावर ७ टक्के दराने (५% मुद्रांक शुल्क, १% स्थानिक संस्था कर आणि १% मेट्रो कर) एकूण २१ कोटी रुपये भरावे लागतील, त्यानंतरच व्यवहार रद्द होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Parth Pawar Land Row: अमेडिया कंपनीने व्यवहार रद्द करण्यात यावा असं पत्र दिलं

पार्थ पवार यांचे 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय या व्यवहारातून सुटका होणार नाही. हा व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या कंपनीला 21 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरावा लागणार असल्याची अट सह दुय्यम निबंधक कार्यालयाने घातली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेत आलेल्या वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर अमेडिया कंपनीने व्यवहार रद्द करण्यात यावा असं पत्र दिलं आहे, या पत्राला उत्तर देताना सह दुय्यम निबंधक कार्यालयाने मुद्रांक शुल्क भरण्याची अट घातलेली आहे.

Parth Pawar Land Row: आता पुन्हा तुम्हाला ती सवलत मिळणार नाही

मिळालेल्या माहितीनुसार पार्थ पवार यांच्या कंपनीने हा व्यवहार रद्द करण्याचा स्पष्ट केलं, त्यासाठी अमेडिया कंपनीचे अधिकारी सह दुय्यम निबंधक कार्यालयात गेले, त्यावेळी त्यांनी लेखी स्वरूपामध्ये आपण हा व्यवहार रद्द करू इच्छितो असं दिलं, मात्र त्याला उत्तर म्हणून सहदुय्यम निबंधक कार्यालयाने एक पत्र अमेडिया कंपनीला दिलेला आहे, या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आधी व्यवहार करताना त्या ठिकाणी आयटी पार्क होणार आहे असं सांगून मुद्रांक शुल्कातून सवलत मिळवली होती. मात्र आता तिथे आयटी पार्क होणार नाही, ज्या कारणासाठी तुम्हाला सवलत मिळाली होती, ते कारण निरस्त झालेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा तुम्हाला ती सवलत मिळणार नाही. त्यामुळे आता व्यवहार रद्द करणं म्हणजे आता नव्याने होणं, म्हणजेच पुढे अमेडिया कंपनीने ही जमीन पुन्हा शीतल तेजवानी यांच्याकडे सोपवणे आहे, त्यासाठी तुम्हाला 21 कोटी रुपये भरावे लागतील. एकूण 300 कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे, यामध्ये पाच टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रोचा कर आहे. असे सर्व मिळून तुम्हाला 21 कोटी भरावे लागतील, तरच हा व्यवहार रद्द होईल असं निबंधक कार्यालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता पार्थ पवार यांची दोन्ही बाजूने कोंडी झालेली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.