जमीन घोटाळाप्रकरणी 8 जण अडकले, पार्थ पवार सुटले; अजूनही पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही?, मह
पुणे: मुंढवा परिसरातील तब्बल 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून मोठा वाद पेटला आहे. पार्थ पवार (Parth Pawar Land Scam) यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित या व्यवहारात शासनाच्या मुद्रांक शुल्कात फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली असून, त्यावरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह जिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीत जमीन विक्रेत्या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांची नावे नमूद आहेत. याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून संबंधित प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं (Parth Pawar Land Scam) नाव का घेण्यात आलं नाही त्याच्यावर गुन्हा का नोंद झाला नाही असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता, त्या प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना भाष्य केलं आहे.(Parth Pawar Land Scam)
Parth Pawar Land Scam: लिहून देणारे आणि लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाहीयेत
प्रथमिक चौकशीमध्ये जे रजिस्टर कार्यालयामध्ये जे सही करणारे, लिहून देणारे आणि लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाहीयेत, त्या कंपनीचे कोण कोण भागिदार आहेत, हा कंपनीचा नियम वेगळा आहे. त्याची नोंदणी करताना रजिस्टारसमोर कोण-कोण गेले होते, त्यांची नावे आमच्याकडे आहेत, त्या पत्रकावर लिहून देणारा कोण, लिहून घेणारा कोण त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत, अजितदादांनी याबाबत स्पष्ट केलं आहे त्यामुळे त्या आरोपावर चर्चा करण्यापेक्षा चौकशी होऊ द्यावी चौकशीचा रिपोर्ट महिनाभरात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.
Parth Pawar Land Scam: पहिल्या टप्प्यात जे आम्हाला आढळलं त्यांच्यावर गुन्हा दाखल
अजित दादांनी जे म्हटलं ते त्यांना माहिती, पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न तर महसूल खात्याने प्राथमिक अहवाल आला त्या आधारे तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी, मुद्रांकाचे डॉक्युमेंट्स तयार करणारे, कंपनीचा मालक असेल खरेदी विक्री करणारे असतील. नोंदणीच्या वेळी ज्यांनी सही केल्या ते पहिल्या टप्प्यात जे आम्हाला आढळलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, आणि सखोल चौकशी केल्यावर गुन्हे दाखल होतील. आता प्राथमिक चौकशीत जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई आणि गुन्हे दाखल केले आहेत, आता चौखल चौकशी आमचा महसूल खातं करतील खारगे समितीचा रिपोर्ट आल्यावर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे, पुढच्या टप्प्यात समितीचा अहवाल आल्यावर कारवाई करेल. विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यांची समिती झाली आहे आणि एक महिन्याच्या आत अहवाल सादर करेल. जे काही आरोप झाले त्याची सविस्तर चौकशी करून मग अंतिम निर्णय करू असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.
तिघांवर गुन्हे, आरोप काय? (Parth Pawar Land Scam)
पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहाराप्रकरणी 8 आरोपींवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, सूर्यकांत येवले,रवींद्र तारू यांच्यासह 8 जणांवर या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
1. शीतल तेजवाणी- जागेची पॉवर ऑफ एटर्नी असल्याचे सांगत जमीन विकली.
2. दिग्विजय पाटील- पार्थ पवारांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांनी मुद्रांक शुल्काचे पाच कोटी 89 लाख रुपये बुडवले.
3. रविंद्र तारु- नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी असूनही खरेदी-विक्रीवरचा 2 टक्के अधिभार आणि कर वसूल केला नाही.
Parth Pawar Land Scam: पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना सहीचे अधिकार दिल्याचा ठराव समोर
अमेडिया कंपनीकडून खाजगी एलएलपी आयटी कंपनी उभारली जाणार होती. यासाठी जी खरेदी विक्री केली जाणार होती, त्याच्या सहीचे अधिकार पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना देण्याचा 22 एप्रिल 2025ला प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाची प्रत आता समोर आलीये. या प्रस्तावानंतर 20 मे 2025ला वादग्रस्त जमिनीचा दस्त झाला. हा दस्त दिग्विजय पाटलांच्या सहीने झाला असून पार्थ पवारांनी सहीचे दिलेल्या अधिकाराची प्रत ही सोबत जोडण्यात आलेली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.