पुण्यातील खेडमध्ये अनधिकृत रिसॉर्टवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची रंगली पार्टी? काँग्रेस नेत्य

पुणे: राज्यभरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांवक कारवाईचा बडगा उगारत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशातच दुसरीकडे पुणे शहरामध्ये अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी करत असल्याचा आरोप आता होताना दिसत आहे.  काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली, आणि त्यात उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करत सहभागी झाले असं म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवारांची पोस्ट काय?

“अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी?? जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात! पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली, आणि त्यात उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करत सहभागी झाले. ही पार्टी ज्या रिसॉर्टमध्ये झाली, ते रिसॉर्टच अनधिकृत असल्याचा आरोप आहे! एकीकडे सामान्य नागरिकांवर लहानसहान कारणांसाठी कारवाई केली जाते, अनधिकृत बांधकामे तोडली जातात, तर दुसरीकडे महसूल अधिकारीच अनधिकृत रिसॉर्टवर मजा करत आहेत. महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे, याकडे लक्ष आहे का?”, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवरती तोफ डागली आहे.

वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय?

एका ठिकाणी मोठी स्क्रिन लावण्यात आलेली आहे, त्यावरती गाणी सुरू आहेत. तर छोट्या स्टेजच्या खाली काही महिला आणि काही लोक नाचताना दिसत आहेत. मागून स्क्रिनवरून येणाऱ्या प्रकाशामुळे काहींचे चेहरे दिसत नाही.मात्र महिला आणि काही पुरूष हे त्या ठिकाणी नाचताना दिसत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.