राजस्थानमध्ये पॅसेंजर ट्रेन नाल्यात पडल्याने प्रवाशांचा मृत्यू
सर्व मृत मध्य प्रदेशमधील असल्याचे स्पष्ट
कोटा : राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर एक टेम्पो ट्रॅव्हलर (मिनीबस) पुलावरून खाली कोसळली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत मध्य प्रदेशातील बेतुलचे रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेत अन्य 17 जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. हा अपघात शनिवारी सकाळी 6 वाजता सिमलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. ट्रॅव्हलर भोपाळहून खाटूश्यामजीकडे जात असताना कोटा शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या कराडिया टोलजवळ ती पुलावरून 15 फूट खाली कोसळल्याचे एसएचओ नंद सिंग यांनी सांगितले. अपघातानंतर वाहनाच्या काचा फोडून जखमींना वाचवण्यात आले. तसेच सीटमध्ये अडकलेले मृतदेह मोठ्या कष्टाने बाहेर काढण्यात आले. बसमधील सर्व प्रवासी नातेवाईक होते. राजस्थानमधील पर्यटनासाठी ते शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता भोपाळहून खाटूश्यामच्या दिशेने निघाले होते, असे पोलीस अधीक्षक सुजित शंकर यांनी सांगितले.
Comments are closed.