ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दोन खेळाडूंनी देशासाठी आयपीएलची कोट्यवधी रुपयांची ऑफर धुडकावली, नेमकं काय
पॅट कमिन्स ट्रॅव्हिस हेड दर वर्षी 58 कोटी रुपये नाकारतात : सध्या जगभरात टी20 फ्रँचायझी क्रिकेटचा जबरदस्त बोलबाला आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा फ्रँचायझी क्रिकेटलाच प्राधान्य देताना दिसत आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग मानली जाते, जिथे खेळाडूंवर अक्षरशः पैशांचा पाऊस पडतो. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि जबरदस्त फलंदाज ट्रॅव्हिस हेड (Travis Head) यांनी आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आता या दोघांबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका आयपीएल फ्रँचायझीने या दोघांना विविध टी20 लीगमध्ये खेळण्यासाठी प्रचंड मोठी ऑफर दिली होती, पण त्यासोबत एक चकित करणारी अट ठेवली होती. त्या ऑफरनुसार, दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियाचे कर्णधार पॅट कमिन्स आणि स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांना फ्रँचायजी क्रिकेट खेळण्यासाठी दरवर्षी तब्बल 10 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 58 कोटी रुपये) इतका ऑफर देण्यात आला होता. सध्या कमिन्स आपल्या केंद्रीय करार, कर्णधारपद आणि सामन्यांची फी मिळून सुमारे 26 कोटी रुपये कमावतात. हेड सर्व फॉरमॅटमध्ये खेळूनही आपल्या कर्णधारापेक्षा कमी कमाई करतो. तरीदेखील, दोघेही ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास कटिबद्ध आहेत.
या आश्चर्यकारक ऑफरनंतर बिग बॅश लीग (BBL)च्या खासगीकरणाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियन टी20 लीगला दशकभराहून अधिक काळ झाला असला तरी, खेळाडूंना फार मोठे मानधन मिळत नाही. दरम्यान, कमिन्स आणि हेड हे वर्षभर फ्रँचायजी क्रिकेट खेळण्याचा प्रस्ताव नाकारलेले पहिले खेळाडू नाहीत. असा दावा केला जातो की, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यानेही 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आलेला असाच प्रस्ताव नाकारला होता.
हैदराबादने ट्रॅव्हिस हेडला 14 कोटीं दिले, तर…
सनरायझर्स हैदराबाद (SRH)ने मेगा ऑक्शनपूर्वी कमिन्सला 18 कोटी रुपयांत रिटेन केले होते. त्यानंतर 2024 च्या आयपीएल लिलावात त्यांना 20.5 कोटी रुपयांत डील करण्यात आले, मात्र पुढील वर्षी त्यांच्या पगारात कपात झाली. वनडे विश्वविजेता कर्णधार कमिन्सने एसआरएचचे नेतृत्व दोन हंगाम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएल 2024 मध्ये अंतिम फेरी गाठली, पण 2025 मध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, एसआरएचने ट्रॅव्हिस हेडला 14 कोटी रुपयांत रिटेन केले होते.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.