दिव्यांग नव्हे दैवी आत्मे ! पतंजलीनं 250 हून अधिक दिव्यांगांना दिला नवजीवनाचा हात
Patanjali : हरिद्वारमधील पतंजली योगपीठ येथे पतंजली वेलनेस आणि उद्धार जेफरीज नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 व 27 जुलै रोजी दोन दिवसीय मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या जनसेवा शिबिराचा यशस्वी समारोप झाला असून, यामध्ये 250 हून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, बैसाख्या यांसारखी सहाय्यक उपकरणे मोफत वितरित करण्यात आली.
दर 3 ते 4 महिन्यांनी शिबिराचे आयोजन
या शिबिराला लाभलेली यशस्वी प्रतिक्रिया पाहता, आता हे शिबिर दर तीन ते चार महिन्यांच्या अंतराने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष प्रसंगी पतंजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव आणि संयुक्त महासचिव आचार्य बालकृष्ण उपस्थित होते. त्यांनी स्वतः लाभार्थ्यांना उपकरणांचे वाटप केले व त्यांना आत्मनिर्भरतेच्या मार्गावर प्रोत्साहित केले.
“हे दिव्यांग नाहीत, तर दिव्य आत्मा आहेत” – बाबा रामदेव
या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी सांगितले की, “हे दिव्यांग नाहीत, दिव्य आत्मा आहेत. त्यांना सहानुभूती नव्हे, तर सशक्तिकरणाची गरज आहे.”तर आचार्य बालकृष्ण यांनी देखील शिबिरात उपस्थित राहून दिव्यांगजांशी संवाद साधला आणि सांगितले की, “पतंजलीचा उद्देश फक्त आयुर्वेदिक आरोग्य पुरवणं नाही, तर प्रत्येक माणसाला आत्मनिर्भर बनवणं, हेच आमचं राष्ट्रसेवा आहे.”
एक सेवायज्ञ: अनेक संस्थांचा सहभाग
या सेवायज्ञाचे आयोजन भगवान महावीर विकलांग सहायता समिती, उद्धार सेवा समिती, अनुभवी डॉक्टर, कुशल तंत्रज्ञ, आणि पतंजली सेवा विभागातील सेवाभावी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आले. शिबिरात केवळ उपकरण वितरणच नव्हे, तर लाभार्थ्यांसाठी मोजमाप, फिटिंग, फिजिओथेरपी व सल्ला देण्यासाठीही योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
आत्मबल वृद्धीचा प्रेरणादायी उपक्रम
हा उपक्रम केवळ शारीरिक सहाय्यापुरता मर्यादित न राहता, दिव्यांगजनांच्या आत्मबलाला सुद्धा बळ देणारा प्रेरणास्त्रोत ठरला. पतंजली योगपीठाची ही प्रेरणादायी सेवा मानवसेवा व राष्ट्रसेवेतील त्यांची दृढ बांधिलकी अधोरेखित करते. या शिबिरात मुख्यतः स्वामी विदेहदेव, स्वामी पुण्यदेव, बहन पूजा यांच्यासह उद्धार टीम मॅनेजमेंटचे सदस्य उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी संजय, रुचिका अग्रवाल, श्रुती, प्रधुमन, रवि, दिव्यांशु, कृष्णा, निहारिका, दिव्या, दीनदयाल आदींचे मोलाचे योगदान लाभले.
आणखी वाचा
Comments are closed.