भुदरगडमधील पाटगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले, 12 हजार हेक्टर शेतजमिनीचा पाणीप्रश्न मिटला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यंदा उशिरा सुरू झालेला पाऊस आणि पावसाचे कमी प्रमाण यामुळे तब्बल दीड महिना उशिराने भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गतवर्षी हे धरण 26 जुलै 2025 रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा 8 सप्टेंबरला धरण भरले. धरण भरल्याने वेदगंगा नदीच्या काठावरील शेकडो गावांचा पाण्याचा व 12 हजार हेक्टर शेतजमिनीचा उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे वेदगंगा नदीवर पाटगाव धरण (श्री मौनीसागर जलाशय) 3.716 टीएमसी क्षमतेचे धरण आहे. सन 1997-98 साली या धरणाचे काम पूर्ण झाले. यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. जून महिना कोरडा गेला तर जुलै महिन्याच्या पंधरवडय़ानंतर पावसाने सुरुवात केली. शिवाय यंदा धरण क्षेत्रात व पूर्ण भुदरगड तालुक्यातच पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे यंदा तब्बल दीड महिना उशिराने धरण भरले आहे.

धरणक्षेत्रात 1 जूनपासून आजअखेर 4926
मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाटगाव धरणाचा पाणीसाठा पूर्ण संचय पातळी 626.60 मीटर आहे. आज रोजी धरणाची पाणीपातळी 626.60 मीटर आहे. धरणात 105.242 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा म्हणजे 3716.62 दशलक्ष घनफूट इतका आहे. म्हणजे 3.716 टीएमसी इतका आहे. म्हणजे आज रोजी धरण 100 टक्के भरले आहे. धरण भरल्याने थोडय़ा प्रमाणात सांडव्यावरून पाणी नदीपात्रात पडत आहे.

Comments are closed.